पान:महाराज रणजितसिंह यांचे चरित्र.pdf/४४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ३९ )

फिरत असतां 'हीरात ' व ' कंदाहार' ह्या मार्गानें पंजाबात प्रवेश करता झाला. नंतर तो लाहोर दरबाराकडे आल्यावर रणजितसिंगाने त्याची सर्व हकीकत ऐकून घेऊन व तत्संबंधानें आपली पूर्ण खात्री करून घेऊन त्यास जनरल व्हेंदूरा प्रमा- र्णेच आपल्या पदरीं ठेवून घेतलें. नंतर कांहीं दिवसांनी त्याची हुशारी वगैरे पाहून त्यास आपल्या घोडेस्वारांच्या पलटणींवर मुख्य अमलदार नेमिलें. जनरल व्हेंटूरा याजकडे तर त्यानें पूर्वीच खास फौजेच्या मुख्याचें काम दिलेलें होतें. ह्याप्रमाणे कंपनीसरकार व फ्रेंचसरकार ह्या दोन्ही पररा- ष्ट्रीयांची त्या मानी रणजितसिंगानें फारशी गरज न बाळगितां ह्या वरील दोघां सरदारांकडूनच आपल्या सैन्याची सुधारणा करण्याचा बेत मनांत आणून तो बहुतेक अंशी शेवटासही नेला. त्या परकीय सरदारांनी आपआपल्या तैनातींतील शिपायांस पाश्चात्य लष्करी शिक्षण देऊन त्या कलेत त्यांस बरेंच तरबेज केलेलें रणजितसिंगानें पाहून तो फार खुष झाला व त्याबद्दल त्यानें त्या दोघां सरदारांस चांगले बक्षीसही दिलें. इतकेंच नाहीं तर त्या दोघांवर त्याचा विश्वास बसल्यामुळे त्यानें पुढे जनरल व्हेंरा यास लाहोर येथील सुभेदारी देऊन *'काजी ' चीं वस्त्रेही दिलीं; तेर्णेकरून तो परकी सरदार लाहोर दरबारांत तिसऱ्या दर्जाचा अमलदार होऊन राहिला
.  वरील दोन परद्वीपस्थांखेरीजकरून त्यांच्या मागून लवक- रच आणखीही कांहीं युरोपियन गृहस्थ रणजितसिंगाने आपल्या फौज - खात्यांत ठेविले होते. त्यांपैकीं कर्नल 'कोर्ट' नामक फ्रेंच सरदाराकडे गुरखे लोकांच्या दोन पलटणींचें आधिपत्य दिले
● 'काजी' हा आरवी पारिभाषिक शब्द असून त्याचा अर्थ ' न्यायाधीश' असा होतो.