पान:महाराज रणजितसिंह यांचे चरित्र.pdf/४५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

( ४० )

होतें आणि तोफखान्यावर कर्नल ' गार्डनर' ह्या नांवाचा एक ऐरिश गृहस्थ मुख्य नेमिला होता. तसेंच 'व्हान कोर्टलंड ह्या नांवाचा दुसरा एक गृहस्थ रणजितसिंगानें आपल्या लष्करांत ठेविला होता. हा गृहस्थ कोणत्या जातीचा होता; याविषयीं कोठें चांगला खात्रीलायक खुलासा आढळत नाहीं. हा सरदार शीखलोकांचें राज्य नष्ट होईपर्यंत लष्करी खात्यांत होता व नंतर तो कंपनीसरकारच्या मुलकीखात्यांत नोकरीस राहिला. ह्यानें हिंदुस्तानांत इ. स. १८५७ त में शिपायांचें मोठे बंड झाले त्यासमयीं कंपनीसरकाराची चांगली कामगिरी बजाविली होती असे म्हणतात. जनरल 'अव्हिटेविले ' ह्या नांवाचा नेपोलियन बोनापार्टाच्या घराण्यांपैकी एक गृहस्थ रणजितसिंगानें आपल्या पदरीं ठेविला होता, त्याची नेमणूक मुख्यतः राजकीय कामाकडे केलेली होती; तथापि रावी व चिनाब ह्या दोन नद्यांमधील प्रदेशाची * व्यवस्था पहाण्याचें काम त्याजकडे सोपविलें होतें; पण पुढे कांहीं दिवसांनी त्याची बदली पेशावर येथे केली. ही स्वभावाने कडक असून, स्वकार्यदक्ष व स्वामिसेवापरायण असल्यामुळें त्यानें त्या प्रांतांत व आजूबाजूच्या डोंगराळ प्रदेशांत राहणाऱ्या रानटी लोकांस जेरीस आणून त्यांवर आपला चांगलाच छाप बसविला होता व अद्यापही खैबर खिंडींतील व तिच्या आसपास राहणाऱ्या लोकांस ह्या गृहस्थाचें नुसतें नाव निघाले असतां फार दहशत वाटते.
 ह्याप्रमार्णे रणजितसिंगाच्या दरबारांत परराष्ट्रीय लोकांचा प्रवेश झाला होता खरा; तथापि तो त्यांवर फार सावधगि-ह्या प्रदेशास 'रेचना ' दुबाब असें म्हणतात,