पान:महाराज रणजितसिंह यांचे चरित्र.pdf/४६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

( ४१ )

रोनें लक्ष ठेवीत असे. एकादेवेळी ह्या परकीय सरदारापकी कोणास मोहिमेवर जाण्याचा प्रसंग आला असतां, रणजितसिंग मुद्दाम असें करी कीं, आपल्या विश्वासांतील एकादा मोठा शीख सरदार अथवा राजपुत्र * खडकसिंग' यांपैकी कोणाची तरी त्या मोहिमेवर मुख्य सेनापती म्हणून नेमणूक करीत असे. विशेषतः शीख सरदारांपैकी दिवाण मोकमचं- दाचीच अशा प्रसंगी नेमणूक होत असे. असो. रणजितसिंगानें आपल्या फौजेची अशा प्रकारें व्यवस्था लावून जे परकीय सरदार राजकीय कामास योग्य असे वाटले त्यांजकडे तशाच प्रकारचीं कामें दिली होतीं. ह्याचें उदाहरण आम्हीं वर दिलेच आहे. ह्याखेरीज एतद्देशीय शीख सरदार व मुत्सद्दी - लोक रणजितसिंगाच्या दरबारांत बरेच होते. त्यांत दिवाण मोकमचंद याजवर त्याचा पूर्ण विश्वास व कृपा असे. हा शीख सरदार इ. स. १८०६ पासून इ. स. १८११ पर्यंत रणजितसिंगांचा मुख्य सेनाधीश होता. त्याचा नातू रामदयाळ ( हा. इ. स. १८२० त हजारा प्रांतावरील स्वारीत मृत्यु पावला. ) मोठा रणपटु होता. तो आणखी कांहीं दिवसपर्यंत वांचला असता, तर तो फारच नांवालौकि- कास चढला असता, असें त्यावेळीं सर्वांस वाहूं लागलें होतें. त्याचप्रमाणे दिवाण मिसरचंद हा बनिया अथवा वाणी जातीचा रणजितसिंगाच्या लष्करांत मोठा अमलदार होऊन गेला. ह्या सरदाराचा दुसरे शीख सरदार फार द्वेष करीत असत; परंतु रणजितसिंग स्वतः त्याची कर्तबगारी पाहून मनांत फार खुप झाला होता. ह्याच शूर सरदारानें इ. स.
हा रणजितसिंगाचा पुत्र होता. त्याची हकीकत पुढील भागांत येईल.