पान:महाराज रणजितसिंह यांचे चरित्र.pdf/४७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

( ४२ )

१८१८ मुलतान घेतलें, ह्याशिवाय आणखीही लहानमोठे शीख सरदार रणजितसिंगाच्या लष्करी खात्यांत बरेच होते.  ह्याप्रमाणे रणजितसिंगानें आपल्या राज्याच्या संरक्षणाचे जें मुख्य साधन म्हणजे लष्करी खातें त्याचा चांगला बंदोबस्त केल्यानंतर आपले लक्ष आपल्या मुलखाचें उत्पन्न वाढ- विण्याकडे लाविलें. ह्या कामी त्यानें आपल्या रयतेवर बराच जुलुम चालविला होता. त्यावेळी त्याच्या राज्याचे एकंदर उत्पन्न सुमारे १८ लक्ष रुपयांजवळ जवळ होतें. त्यानें रयतेवर ४८ बाची लादिल्या होत्या; आणि त्यांची उगवणी करण्याकरितां जुलमी कामदारांची योजना केलेली होती. एकादा जिन्नस कोणी आपल्या खाजगी उपयोगाकरितां परदेशांतून आणिला असतां त्यावर तीन वेळ जकात घेण्याचे त्याने ठरविलें होतें व तशीं जकात देण्यास कोणी कुरकुर किंवा हरकत केली असतां, त्यास फार कडक रीतीनें शासन करण्याचाही तो कधीं कधीं हुकूम करीत असे. अशा रीतीनें राज्याची जमाबंदी वसूल करण्याकरितां जे अधिकारी नेमिले होते त्यांस 'करदार ' अशी संज्ञा होती; तथापि राज्याचा मुख्य कारभार करणारी मंडळी निराळीच होती. कारभारी मंडळांत दिवाण 'सावनमल हा सर्वात उत्तम होऊन गेला. त्याजकडे रणजितसिंगानें पंजाबच्या दक्षिणेकडील प्रांत म्हणजे मुलतान, देरागाजीखान, खानगड, जंग आणि लिहा ह्या प्रांतांच्या सुभेदारीचें काम सोपविलें होतें. 'आबी- एन* नामक एका इंग्रज अधिकाऱ्यानें सावनमल्लाविषयीं आपल्या खलित्यांत असें म्हटलें आहे कीं, " सावनमलानें आपल्या ताब्यांतील प्रांताचा कारभार त्यापूर्वीच्या कारभारा-
Mr. O'Briens' settlement Report of Muzaffargarb.