पान:महाराज रणजितसिंह यांचे चरित्र.pdf/४८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

( ४३ )

पेक्षां फार उत्तम रीतीने चालविला होता. त्याचा मुख्य उद्देश जेणेकरून रयतेचे आपल्या हातून कल्याण होऊन राज्याचे उत्पन्न वाढेल तसें करण्याचा होता. त्याने लोकांच्या जीवि- तार्चे व वित्ताचें रक्षण चांगल्या प्रकारें होण्याकडे विशेष लक्ष दिलें होतें. रयतेस योग्य व वेळच्यावेळीं न्याय मिळणे व शेतकरी लोकांस उत्तेजन मिळून त्यांजकडून शेतकीची सुधारणा होणें ह्या दोन गोष्टी राज्यास चिरस्थायी करणाऱ्या आहेत है तत्व त्याच्या मनांत पूर्ण बिंबलेलें होतें. "
 रणजितसिंगाच्या राज्यांतील जकातखात्यावरील मुख्य दिवाणाचे काम 'मिसर रालाराम' ह्या नांवाच्या गृहस्थाकडे होते; परंतु तो लवकरच मयत झाल्यावर तें त्याचा पुत्र राजा साहेव दयाळ' हा पाहूलागला. रणजितसिंगाचा मुख्य सल्लामसलतगार म्हटला म्हणजे सरदार ' लेहनासिंग ' ह्या नांवाचा एक माजा रजपूत होता. ह्या लेहनासिंगास पुढ ' हरामद्दौला ' हा किताब मिळाला होता. ह्या लेहना- सिंगासंबंधाने इतिहासांत एके ठिकाणीं असें लिहिलेले आढळतें कीं, तो मोठा रसायन शास्त्रवेत्ता असून ज्योतिषशास्त्र सुद्धां त्यास अवगत होतें. त्यानें रणजितसिंगाच्या तोफखान्यांत चांगली सुधारणा करून खुद्द आपल्या अकलेनें कित्येक बंदुका व तोफा शास्त्रीय पद्धतीने तयार केल्या होत्या; त्यांपैकी कांहीं तोफा तर पुढें शीख लोकांनी इ. स. १८४३ त ' अलिवाल ' व ' सोनान वगैरे ठिकाणी इंग्लिशांच्या व त्यांच्या ज्या लढाया झाल्या त्यांत आपल्या बरोबर आणिल्या होत्या. असो.
वर सांगितलेल्या मुत्सद्दी लोकांशिवाय रणजितसिंगाच्या सर्व राजकीय खात्यांवरील मुख्य प्रधानकीचे काम 'राजा