पान:महाराज रणजितसिंह यांचे चरित्र.pdf/४९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ४४ )

दिनानाथ' नांवाच्या गृहस्थाकडे होतें. राजा दिनानाथ हा पूर्वी एक सुखवस्तु पंजाबी ब्राह्मण होतो. त्यानें रणजित्- सिंगास वेळोवेळी योग्य सल्ला देऊन आपल्याकडे त्याचें मन वळवून घेतलें होतें; शिवाय तो फार लोकप्रियही झाला होता. त्याला जेव्हां मुख्य प्रधानकीचीं वस्त्रे मिळाली तेव्हां त्यानें जमाबंदीकडील व्यवस्था सुधारून पूर्वी करदार लोकांस वसुलाच्या बाबतींत जे जुलमाचे हुकूम जात असत ते जाण्याचे बंद करून रयतेस सुखी केलें. पुढें रणजितसिंगाच्या मरणानंतर कंपनी सरकारानें त्या राज्याचा कारभार आपणा- कडे घेतल्यावर लाहोर येथें एक कौन्सिल स्थापून त्याचें प्रमुखत्व राजा दिनानाथ याजकडेसच दिलें होतें. असो. रणजितसिंगाच्या परराष्ट्रीय वकीलीचें काम एका मुसलमान गृहस्थाकडे होतें. त्याचें नांव ' फकीर अझिझुद्दीन' असें होतें. हा मुसलमान गृहस्थ वैद्यकीच्या धंद्यांतही बराच निष्णात् होता. इ. स. १८०२ त लाहोर शहर रणजित्- सिंगाने काबीज केल्यावर तो 'ऑपथॉलूमिया* ' नांवाच्या रोगानें आजारी पडला, तेव्हां फकीर अझिझुद्दीन यानें त्यास औषधोपचार करून बरा केला. हे त्याचे उपकार जाणून रणजितसिंगानें त्यास कांहीं गांव बक्षीस देऊन आपल्या खानगीकडे त्याची नेमणूक केली. इ. स. १८०८ त कंपनी सरकार व रणजितसिंग ह्यांच्यामध्यें सतलज नदीच्या दक्षिणे- कडील प्रांतासंबंधानें चकमक झडण्याचा प्रसंग आला होता, तो टाळून कंपनी सरकारचा व रणजितसिंगाचा जो कायमचा सलोखा झाला त्याचें मूळ फकीर अझिझुद्दीनच होय. इ. स. १८३१. त हिंदुस्तानचा गव्हरनर जनरल लॉर्ड वुईलियम्ह्यास मराठीत ' नेत्ररोग ' असें म्हणतात: