पान:महाराज रणजितसिंह यांचे चरित्र.pdf/५०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

(४५)

पेन्टीक यानें 'रूपर ' येथें दरबार भरवून रणजितसिंगास त्या दरबारास येण्याविषयी बोलावणें केल्यावरून त्यानें आपल्या- तर्फे आपला वकील म्हणून फकीर अझिझुद्दीन यास रूपर येथें पाठविलें होतें. त्याप्रमार्णेच इ. स. १८३५ त काबूलचा 1. अमीर दोस्त महमदखान व रणजितसिंग या उभयतांमध्यें कांहीं कारणावरून तंटा उत्पन्न झाला होता, तो मिटविण्या- करितां कावुलास जाण्यासाठी ह्याचीच रणजितसिंगानें योजना केली होती. नंतर इ. स. १८३८ त ' फिरोजपूर येथे गव्हरनर जनरल 'लॉर्ड ऑकलंड ' यानें जो बडा दरबार भरविला होता, त्यावेळीही रणजितसिंगातर्फे फकीर अझि- झुद्दीनच हजर होता. सारांश, फकीर अझिझुद्दीन फारसा विद्वान् नसतां केवळ आपल्या अंगच्या गुणांनी रणजित्- सिंगाच्या दरबारांत एक उच्च प्रतीच्या दर्जाचा मनुष्य होऊन मेला. फकीर अझिझुद्दीनाप्रमाणेच त्याचे दोघे बंधुही रणजितसिंगाच्या कारकीर्दीत उदयास आले होते. त्यांपैकीं इमामुद्दीन यास ' फकीर साहेब ' आणि नूरुद्दीन यास 'खलिफा साहेब ' असे म्हणत असत. इमामुद्दीनास अमृतसर येथील गोविंदगड किल्ल्यावरील मुख्य अधिकारी नेमिला होता व नूरुद्दीन यास तशाच प्रकारचा एक मुख्य कामदार केला होता. असो. एकंदरीनें पहातां रणजितसिंगाने आपल्या कारकीर्दीत जातिभेद लक्षांत न आणितां केवळ सद्गुण व हुशारी वगैरेवर लक्ष देऊन आपल्या दरबारची स्थापना केली, व कांहीं काळपर्यंत् अशा लोकांच्या हातून आपला राज्यशकट अबाधितपर्णे चालवून घेतला, हें त्यास अतिशय भूषणास्पद झालें यांत संशय नाहीं.