पान:महाराज रणजितसिंह यांचे चरित्र.pdf/५१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

( ४६ )

भाग ६

रणजितसिंगाच्या शारीरिक स्थितीचे वर्णन-त्याची

संपत्ती- कोहिनूर व लाली घोडी-तत्संबं- धाची हकिकत - इत्यादि रणनित्सिंगाचा जन्म बाल्यावस्थेपासून तहत तो पूर्णा- वस्थेत येईपर्यंत दगदगीत गेला अर्से मागील विवेचनावरून सहज लक्षांत येण्याजोगे आहे. तो बारा वर्षांचा झाला नाहीं तोंच पितृसुखास अंतरला, त्या योगानें त्यास विद्या- सुखास मात्र आंचवावें लागले. त्यास सुमारें चाळीशीच्या आंतच लढाया, संकटें व त्रास हीं भरपूर मिळालीं होतीं म्हणून तो अगदीं निगरगट्ट असा बनला होता. इतकेंही असून पुढे कांहीं दिवसपर्यंत तरी त्यानें मिळविलेल्या ऐश्वर्यसुखाचा उपभोग घ्यावयाचा होता! परंतु कर्मगतीनें त्यास घेरिल्यामुळे त्याही सुखास तो अंतरला. कारण पूर्वी म्हणजे इ. स. १८०२ त त्यास जी नेत्ररोगाची भावना उत्पन झाली होती तिचा प्रतिकार बरोबर रीतीनें न झाल्यामुळे ती तशीच राहून तिचा परिणाम त्याच्या शरीरावर घडून त्यापासून त्याची दिवसेंदिवस फारच खराबी होऊं लागून शरीर कमताकद होऊं लागलें. इ.स. १८२४ त कोणी ' मरे ' ह्या नांवाच्या एका इंग्रज नेत्रवैद्यानें त्यास औषधोपचार सुरू केला; परंतु त्या औषधोपचारानें त्याच्या प्रकृतीचें मान चांगलेसें सुधारलें नाहीं; तरी पण रणजित्सिंगार्ने आपल्या अंगलटीच्या बळकटीच्या जोरावर सुमारें १० वर्षे तशीच रेंटीत नेलीं. ह्यामुळे शरीर पुढे अधिक कमजोर झाले असतां इ. स. १८३४ त त्यास अर्धागवायूनें गांठिले. ह्या दुष्ट वायूचा झटका बसल्यावर तर रणजितसिंगाची प्रकृति