पान:महाराज रणजितसिंह यांचे चरित्र.pdf/५२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

(४७)

अत्यवस्थ झाली, तेव्हां 'एम ग्रेगर' नामक इंग्रज वैद्यानें त्यास त्या विकारावर औषध सुरू केलें, पण त्याचा फारसा उपयोग न होतां एवढेच मात्र झाले कीं, तो आपल्या बिछान्याला खिळून मात्र राहिला नाहीं. इतक्या अल्प- वयांत असा भयंकर रोग जडण्याचे कारण असे सांगतात की, तो विषयसुखाच्या नादांत निमग्न असतां त्यास मध्यंतरी मद्यपानाचाही बराच नाद लागला होता. इ. स. १८३७ त पुन्हां त्यास ह्या दुष्ट वायूनें पछाडिलें. ह्यावर्षी त्याच्या नातवाचें म्हणजे 'नवनिहालसिंगार्चे लग्न झालें. हा लग्न- समारंभ त्यावेळी फार अद्वितीय झाला होता. ह्या समारंभास रणजितूसिंगार्ने मोठे मोठे इंग्रज अधिकारीही कलकत्त्याहून बोलाविले होते. त्यांत सर्व हिंदुस्तानचे सेनाधिपती 'सर हेनरी फेन ' हेही आले होते; परंतु ह्या बड्या इंग्रज काम- दाराची व रणजित्सिंगाची मुलाकत त्याप्रसंगी झाली नाहीं, ह्याचे कारण असे सांगतात की, रणजितसिंग दारू पिऊन तिच्या अमलांत अगदीं तर्र होऊन गेल्यामुळे तो अगदीं एकीकडे जाऊन पडला होता. अशा स्थितीत तो असतां त्यास अर्धाग वायूनें पुन्हां गांठिलें, यामुळे त्याची पूर्वीची शक्ति ढांसळून तो उत्तरोत्तर अगदर्दी कमकुवत होत चालला. तेव्हां ही संधी साधून जम्मू संस्थानचे अधिपती 'राजा ध्यानसिंग' व 'गुलाबसिंग हे लाहोर दरबारांत कोणास जुमानीनातसे होऊन त्यांनीं एकच गोंधळ उडवून दिला. फकीर अझिझुद्दीनासारखी स्वामिसेवापरायण मंडळी होती परंतु ती रणजितसिंगाच्या शुश्रूर्धेत गढून गेल्यामुळे त्यांचे लक्ष दरबारच्या घोंटाळ्या- कडे नव्हतें. त्यांचा जीव आपल्या धन्याच्या आरोग्यतेकडे लागला होता. त्यांनी रणजितसिंगास आराम पडण्याविषयीं