पान:महाराज रणजितसिंह यांचे चरित्र.pdf/५३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

( ४८ )

नाना तऱ्हेचे प्रयत्न चालविले होते. कलकत्त्याच्या गव्हनर जनरलास में वर्त्तमान कळतांच त्याजकडूनही चांगले नामां- कित असे इंग्रज हाकीम आले होते; परंतु त्यांस देखील ह्या कामी यश आलें नाहीं. ह्याप्रमाणें जो पंजाबांत व त्याच्या उत्तरेकडील प्रदेशांत सिंहासारखा गर्जत होता व ज्याचा दरारा त्यापेक्षां बलाढ्य अशा कंपनीसरकारासही वाटत होता, तो रणजितसिंग दुर्दैवाने रोगग्रस्त होऊन दीना- सारखा आपल्या बिछान्यावर पडून राहिला. असो. त्यानें जी संपत्ति मिळविली होती तींत अति मौल्यवान् असा कोहिनूर' नामक जगविख्यात् एक हिरा होता. ह्या रत्नासंबंधानें ग्रंथांतरी असे लिहिलेले आढळतें कीं, हा हिरा कौरवपांडवांच्या वेळीं धर्मराजाच्या मुकुटावर बसविलेला होता.) त्यानंतर तो इसवी सनाच्या सोळाव्या शतकांत दिल्लीचे बाद- शहा शहाजन व औरंगजेब ह्यांच्या ताब्यांत आला. नंतर प्रसिद्ध लुटारू इराण देशाचा बादशहा नादीरशहा ह्यानें हिंदुस्तानावर स्वारी करून इ. स. १७३८ त दिल्ली लुटिली, त्या- वेळीं त्या लुटींत त्यास तो हिरा मिळाला. तदनंतर अहमदशहा अबदली ह्या दुराणी सरदाराने त्यास ठार मारून तें बहुमोल रत्न आपल्या स्वाधीन करून घेतलें; आणि शेवटी इ.स. १८१३ त तें आमच्या चरित्रनायकाच्या हस्तगत झाले. तो प्रकार असा.
 काबूलचा राजा शहासुजा ह्यास त्याच्या भावानें पदच्युत केल्यावर त्यानें आपण निराश्रित झालें असें पाहून रणजित्- "सिंगाच्या आश्रयास येऊन राहण्याचा विचार केला आणि त्याप्रमाणे शहासुजाची बायको शहाबेगम इनेंही रणजित्- "सिंगास निरोप पाठविला की, 'तुम्ही काबुलास येऊन