पान:महाराज रणजितसिंह यांचे चरित्र.pdf/५४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ४९ )

आमचा पक्ष धरून आमर्चे संरक्षण कराल तर मजजवळ असलेला कोहिनूर हिरा मी तुम्हास बक्षीस देईन.' ह्या वचनावर रणजिसिंगानें भरंवसा ठेवून आपल्या हुशार व विश्वासू सरदार दिवाण मोकमचंदास शहासुजास त्याच्यां कुटुंबास लाहोर येथे आणण्याकरितां सैन्य देऊन रवाना कल. परंतु हे सैन्य जाण्यापूर्वीच शहा आपल्या जनान- खान्यासह पेशावरास येऊन दाखल झाला होता. मोकमचंदाची व शहासुनाची तेथे भेट झाल्यावर मला ' महाराज रणजित्- सिंगार्ने तुम्हास लाहोर येथें आणण्याकरितां पाठविलें आहे असे मोकमचंदाने सांगितल्यावरून शहास अत्यानंद होऊन लागलीच आपल्या सर्व माणसांसह त्यानें लाहोरास जाण्याची तयारी केली. नंतर हे सर्व खटलें लाहोर येथें आल्यावर बेगमनें आपल्या वचनाप्रमाणे तो हिरा अत्यादर पूर्वक रणजितसिंगास नजर देऊन त्याचे फार आभार मानिले, ह्या गोष्टींत किती तथ्य असेल तें असो. परंतु शहासुजानें खुद्द ह्या रत्नासंबंधानें एके ठिकाणीं असे म्हटलेले आढळतें कीं, तो जेव्हां रणजित्सिंगाच्या आश्रयास येऊन राहिला, तेव्हां रणजिसिंगाने त्याच्याजवळ कोहिनूरहिरा मागितला. परंतु कोहिनूर आपल्याजवळ नाहीं अर्से शहानें स्पष्टपणें सांगितल्यावर त्यास त्याचा संशय आला. नंतर शहासुजास आपल्या राज्यांतील कांहीं जमीन त्या हियाच्या मोबदला देण्याचे रणजितसिंगार्ने वचन दिलें; तथापि त्याने त्याचें मागणे अमान्य केलें. ह्यावरून रणजितत्सिंगास त्याचा राग येऊन त्याने शहास त्याच्या कुटुंबासह अमृतसर येथील गोविंदगड किल्ल्यांत कैदेत ठेविलें. नंतर तेथें शहासु- जाची व त्याच्या कुटुंबाची दोन महिनेपर्यंत रणजितसिंगाच्या