पान:महाराज रणजितसिंह यांचे चरित्र.pdf/५५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ५०)

हुकुमावरून वरीच हालअपेष्टा झाल्यावर आपल्यास आणखी किती दिवसपर्यंत कारागृहवास भोगावा लागेल ह्याचा नेम ही पाहून शहासुजाने अति नम्रपणानें कोहिनूर देण्याचें कवूल केले; तथापि त्या वचनावर रणजितसिंगाचा विश्वास बसेना म्हणून एके दिवशीं तो अमृतसर येथें येऊन किल्यांत कैदी असलेल्या शहासुजास जाऊन मेटला. त्या- "वेळीं शहानें आपल्याजवळच्या संदुकींतून ते अप्रतिम रत्न • बाहेर काढून रणनिताच्या हातांत दिलें. तें घेऊन त्याजकडे पहात असतां त्याची वृत्ति क्षणभर तटस्थ झाली. नंतर त्याने असा विचार केला की, ह्या रत्नाप्रमाणेच आणखीही कांही रत्ने शहाजवळ असली पाहिजेत; म्हणून लोमातिशयानें तो हिरा घेऊन निमूटपणे किल्ल्याबाहेर आला व भाईराम- स्प्रिंग नांवाच्या सरदाराबरोबर आपल्या राण्यांपैकी एका राणीस देऊन त्यांस शहासुजा ज्याठिकाणी आपल्या कुटुंबा- सह रहात होता त्याठिकाणची झडती घेण्याकरितां ताबडतोव रवाना केलें. ही झडती घेणारी मंडळी किल्यांत शिरल्यावर त्यांनी शहापासून तो त्याच्या नोकरचाकरांसुद्धां झडती घेऊन जनानखान्याचीही पण तशीच व्यवस्था केली, व जें जें कांहीं चमत्कारिक व मौल्यवान् असे आढळले, तें तें त्यांनी आपल्या बरोबर घेऊन रणजितसिंगास दाखविण्या करितां लाहोरास गेले. असो. ह्या कोहिनूर हिऱ्या संबंधानें अनेक प्रकारच्या अनेक दंतकथा आहेत, परंतु त्यांविषयीं विचार करण्याची ह्याठिकाणी तादृश गरज नाहीं. मात्र एवढे खचित् की, कोहिनूर हिरा रणजितूसिंगानें काबूलच्या पद्भ्रष्ट राजापासून मिळविला.

 वाचकहो, वर निर्दिष्ट केलेली गोष्ट निर्जीव रत्नासंबंधानें