पान:महाराज रणजितसिंह यांचे चरित्र.pdf/५६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

( ५१ )

झाली. परंतु रणजितसिंगाजवळ असेंच एक अप्रतिम सजीव रत्न होतें. तें रत्न म्हटले म्हणजे लाली ह्या नावाची एक सर्वोत्कृष्ट घोडी होय. तिची हकीकत अशी. ही घोडी पेशावर येथील सुभेदार यारमहमदखान याच्या ताब्यांत होती. रणजित्- सिंगार्ने त्या घोडीची कीर्ति ऐकून इ. स. १८२६ त सदरहू खानाकडे तिजविषयीं मागणें केलें; परंतु खानानें त्याकडे दुर्लक्ष केलें अर्से पाहून रणजितसिंगानें आपला सरदार बुध- सिंग ह्याच्या हाताखाली कांहीं लष्कर देऊन आपला अपमान करणाऱ्या सुभेदारावर पेशावरास पाठविलें. तेव्हां है यारमहमदास कळतांच त्यानें ती घोडी नुकतीच मरण पावली अशी खोटीच भुमका उठविली. तेव्हां बुधसिंगार्ने ह्या गोष्टीचा बारीकरीतीनें शोध करून लाली घोडी मेली नाहीं अशी खात्रीपूर्वक माहिती काढून व हें यारमहमदाचें कृत्रिमः आहे असें जाणून रणजितसिंगास हैं वर्त्तमान कळविलें त्या- वरून रणजितसिंगास ह्या दगलवानीचा अतिशय रागः येऊन त्यानें लाहोर येथून आपला पुत्र खडकसिंग यास युधसिंगाच्या कुमकेस पाठवून दिलें, आणि त्यास त्यावेळीं असेही फर्माविलें होतें कीं, 'एकतर खानानें ती घोडी बिनहरकत तुमच्या स्वाधीन करावी हा उत्तम पक्ष ; नाहींतर त्यानपासून ती जबरीने काढून घेऊन त्यास सुभेदारीवरून एकदम दूर करावें. " ह्याप्रमाणे खडकसिंगास हुकूम होतांच स्याने आपले सैन्य पेशावराकडे चालविलें. तो दरकूच दरम- जल करीत चालला असतां यारमहमदाच्या हेरांनीं है वर्तमान त्यास जाऊन कळविलें. तेव्हां तेथून त्यानें पोबारा करून पेशावरानजीकच्या एका डोंगरांत तो छपून बसला इकडे खडकसिंग पेशावरास जाऊन पाहतो तो यारमहमद