पान:महाराज रणजितसिंह यांचे चरित्र.pdf/५७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ५२ )

ते नसून तो लाली घोडीसह कोणीकडे पळून गेल्याचें त्यास आढळून आलें, म्हणून त्यानें व सरदार बुधर्सिगानें त्याचा पत्ता लाविण्याचे जे जे उपाय होते, ते ते सर्व करून पाहिले; परंतु ते व्यर्थ गेले असें पाहून निराश होत्साते ते दोघेही आपआपल्या लष्करासह लाहोर येथे परत आले. रणजितसिंगाचा स्वभाव पूर्वीपासूनच फार दुराग्रही अस ल्याकारणाने त्याने लाली घोडी प्राप्त करून घेण्याकरितां यत्न करण्याचें न सोडितां जनरल व्हेरा यास पेशावरास जाऊन कोणत्यातरी उपायाने घोडी हस्तगत करून घेण्याचा हुकूम सोडला. ह्यावेळीं जनरल व्हेंटूरा हा अटक येथे आपल्या फौजेसह होता. त्यास हा वरील हुकूम येऊन पोहोचतांच तो अटकेहून पेशावरास जाण्याकरितां ताबडतोब निवाला. परंतु त्यास पूर्वी सांगितलेला खलिपा सय्यद अहमद ह्यानें मध्येच भडवून धरिलें. ह्या कारण जो यारमहमदखान पेशावराहून पळून गेला होता असे आम्ही वर निर्दिष्ट केलें आहे तो, खलिपा सम्यदाच्या आश्रयाखाली येऊन राहिला होता; व शिवाय त्या सम्यदाचा रणजितसिंगाने पूर्वी एकदां पराभव करून त्याचा फार नाश केला होता म्हणून त्याचा सूड उगविण्याच्या हेतूनें त्यानें व्हेंदूराच्या सैन्यास अडवून धरिलें यांत नवल नाहीं. सय्यदाच्या व व्हेंटूराच्या लोकांची कांहीं वेळपावेतों धुम- श्चक्री उडून त्यांत यारमहमदखान तर ठार झालाच; परंतु सय्यदानें आपल्या लोकांस शत्रू अद्यापि अजिंक्य आहे असें सांगून डोंगराच्या आश्रयाचा मार्ग स्वीकारिला. अशा रीतीनें जनरल व्हेंरा यास त्या रानटी सय्यदावर जय मिळाल्यामुळे तो मनांत मांडे खाऊं लागला व पेशावरास