पान:महाराज रणजितसिंह यांचे चरित्र.pdf/५८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

(५३)

- येल्यावर आपण ज्या वस्तूबद्दल विडा उचलून आलो आहों ती वस्तू आपल्या हस्तगत होण्यास आतां बिलकुल विलंब • लागणार नाहीं असें त्यास वाटू लागले. पण हे मनांतील मांडे मनांतच राहिले. कारण यारमहमदखानाचा भाऊ सुलतान महमदखान यास आपल्या बंधूचा वियोग सहन न होऊन त्यानें जनरल व्हेंद्रराचा उघड सूड घेण्याचा निश्चय केला; परंतु हा • त्याचा बेत मुळींच सिद्धीस गेला नाहीं. जनरल व्हेंदूरा यानें त्यास बसें स्पष्ट सांगितलें कीं, "जर तुम्ही लाली घोडी आमच्या स्वाधीन करणार नाहीं, अथवा ती कोठें आहे ह्याचा पत्ता लावून देणार नाहीं तर यारमहमदखानाप्रमाणेंच तुमची दशा निःसंशय झाल्यावांचून राहणार नाहीं; कारण त्या घोडी प्रीत्यर्थ रणजितसिंगास बराच खर्च होऊन प्राण हानिही . बरीच झाली आहे हे लक्षांत ठेवावें."
 जनरल व्हेंदूराच्या ह्या धमकावणीस त्या सुलतान महम- दानें मुळींच भीक घातली नाहीं. त्यानें व्हेंरा यास बऱ्याच मुलथापी देऊन कांहीं दिवसपर्यंत त्यास तसेच वाट पहाण्यास छाविले. शेवटी व्हेंदूराने ही त्याची थापाथापी लक्षांत आणून असे केले की, एके दिवशीं तो सुलतान महमद आपल्या वाडयांत असतां आपल्या लष्करास हुकूम देऊन त्याजकडून वाड्यास गराडा घालविला आणि असे सांगून पाठविलें कीं, जर खाली घोडी आज आमच्या स्वाधीन झाली नाहीं तर तुम्हांस ह्याच वाड्यांत आजन्म हाल भोगीत रहावें लागेल. असा निरोप पोहोचल्यावर सुलतान महमदानें विचार केला कीं, आपल्या भोंवतीं शत्रूने वेढा देऊन आपल्यास कोंडून धरिलें आहे व तो फार बलाढ्यही आहे, म्हणून ह्यांतून आपण पार पडून जाऊं अशी आपल्यास खात्रीही नाहीं, ह्या करितां