पान:महाराज रणजितसिंह यांचे चरित्र.pdf/५९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

(५४)

त्यांचें इच्छित जी लाली घोडी ती त्यांच्या स्वाधीन केल्या- विना आपणास दुसरा तरणोपाय उरला नाहीं. असा विचार करून त्याने ती घोडी लागलीच जनरल व्हेंटूराच्या स्वाधीन केली. ह्याप्रमाणे जनरल व्हेंटूरा यशस्वी होऊन त्या अमोल्य सजीव रत्नासह थोडक्याच दिवसांनीं लाहोर येथे दाखल झाला. ज्यावेळी जनरल व्हेरा लाहोरास येऊन पोहोचला त्या- •वेळी रणजितसिंगास अत्यानंद झाला. आणि ज्या वस्तूची फार दिवसांपासून त्यास अपेक्षा होती व जी मिळविण्या- करितां त्याचें द्रव्य व प्राणहानि झाल्याचें दुःख इतका वेळपावेतो त्यास वाटत होतें, तें तो ती घोडी जनरल च्हेंट्रानें प्रत्यक्ष त्याच्यापुढे आणून उभी केल्यावर अगदींच विसरून गेला. सारांश, रणजितसिंग इतके दिवस ज्या दोन अमोल्य वस्तूंची कीर्ति ऐकत होता व ज्या मिळविण्या- करितां त्याने जे प्रयत्न केले ते शेवटीं सफल होऊन त्याची मनीषा तृप्त झाली.