पान:महाराज रणजितसिंह यांचे चरित्र.pdf/६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

महाराज रणजितसिंग यांचें चरित्र. भाग १. शीख धर्म-त्याचा उत्पादक- त्यांतील वारा मिसली- त्यांचा एकमे- कोश संबंध - चरत्सिंग-महानू सिंग-कन्हैय्या हमी- रसिंग चटाला येथील लढाई - रणजितसिंगाचा जन्म - त्याचे लग्न - महासिंगाचा सोना- नच्या किल्ल्यास वेढा-त्याचा परा- . भव व मृत्यु - इ० या भरतखंडांत फार प्राचीन काळापासून जसे अनेक धर्मपंथ व अनेक जातिभेद झाले आहेत तसे पृथ्वीवरील दुसऱ्या कोणत्याही देशांत नाहीत हे आपणांस इतिहासदृष्ट्या . पाहिले असतां सहज कळून येण्याजोगे आहे. ह्याचें कारण या अफाट देशांत पूर्वी जे जे मोठे पराक्रमी बादशाह व राजे किंवा शूर पुरुष होऊन गेले, त्यांचें लक्ष धर्मसंस्थापने- 'कडे विशेष असल्यामुळे त्यांनीं जो जो मुलूख पादाक्रांत केला त्या त्या मुलखांत आपल्या मताप्रमाणे धर्माची स्थापना केली. अशा प्रकारचा नवीन धर्म- पंथ 'नानक या क्षत्रिय पुरुपानें पंजाबप्रांती पंधराव्या शतकाच्या सुमारास स्थापिला. त्यानें असें केलें कीं, हिंदू व मुसलमानी ह्या दोन्ही धर्मातील शुद्ध तवें निवडून काढून तपूर्ण प्रथमत: आपण स्वीकारिलीं. नवीन नंतर त्यांचा प्रसार हळूहळू त्या प्रांतांत करवून त्यानें या पंथास 'धर्म' • अशी संज्ञा दिली. त्याच्या अंगी शौर्य नानक हा क्षत्रियकुलोत्पन्न असल्यामुळे वसत होतें, व त्याच्याजवळ अनुयायीही • बरेच जमले होते. त्यानें आपल्या शिष्यांस आपण काढि- ●