पान:महाराज रणजितसिंह यांचे चरित्र.pdf/६०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(५५)

भाग. ७

रणजितसिंगाच्या जनानखान्याची स्थिति-त्याचा मृत्यु - राजपुत्र खडकसिंग - त्याचे राज्यारोहण जम्मूराजे ध्यानसिंग व गुलाबसिंग - खडकसिंग व नवानिहालसिंग यांचे खून- धूलिपसिंग - रणजितसिंगाचा प्रेत विधि - इत्यादि इत्यादि.

 वाचकहो, वरील सहा भागांत रणजितसिंगाच्या पूर्व- जांपासून तों त्याचें कर्तृत्व नष्ट होईपर्यंत आम्ही सर्व हकीकत थोडक्यांत नमूद केली आहे. त्याने अगदी बालपणा- पासून शौर्याचीं कामें करून आपले नांव जगांत अजरा- मर करून ठेविलें ही गोष्ट पाश्चात्त्य इतिहासकारांसही •मान्य असल्यामुळे आम्हां भारतयर्षीयांस त्याबद्दलचा जितका • अभिमान व जितकी थोरवी वाटेल तितकी थोडीच आहे. त्यावेळच्या कालदेशवर्तमानरीत्या विचार करून पाहिलें असतां ज्यानें आपल्या बाहुबलाने सर्व यूरोपखंडास थक्क • करून सोडले अशा फ्रान्स देशाच्या नेपोलियन बोनापार्टीची थोरवी व कीर्ति जगांत अद्यापपावेतों जशी दुमदुमून राहिली आहे तसा आमच्या पंजाबी सिंहाचा यशोदुंदुभी • आजवर जो गाजत आहे त्याबद्दलचा आम्हां आर्यास अभि 'मान वाटणार नाहीं असें कालत्रयीं होणार नाहीं. असो. या पूर्वीच्या प्रकरणांत रणजितसिंगाच्या राज्य प्रकरणी व्यवस्थे- संबंधानें आम्हांस जी माहिती मिळाली, तिचें थोडक्यांत परंतु संपूर्ण वर्णन केले आहे. आतां या पुढील भाग म्हणजे रणजितसिंगाच्या कारकीर्दीचा उत्तरार्धच समजला पाहिजे. असे म्हणण्याचे कारण हें कीं, ह्यापुढे त्याची कारकीर्द अगदीं संपत आली होती. त्यास पूर्वी सांगितल्या-