पान:महाराज रणजितसिंह यांचे चरित्र.pdf/६१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(५६)

प्रमाणे अधोगवायूसारख्या प्राणघातक वायूने पुरै मामिलें होतें, तेर्णेकरून तो आपला चिछाना घरून निपचित पडला होता. त्याच्या जनानखान्याची स्थितिही त्यावेळीं बरीच बिघडली होती. परंतु ती सुधारण्यास ह्यावेळी त्यास मुळींच ऊर्जा उरली नव्हती. ह्यामुळे तो जरी सिंहाप्रमाणे गर्जत होता तरी त्यास जें असह्य दुखणे जडलें होते त्यामुळे तो अगदीं दीन गाय होऊन गेला होता. त्याच्या जनान- खान्यासंबंधानें कांहीं ठिकाणी असे प्रलाप निघालेले आढळ- ण्यांत येतात की ते ऐकिले किंवा ग्रंथांतरी लिहिलेले वाचले असतां तत्संबंधाने आपल्या मनाची स्थिति निदान तात्पुरती तरी खचित् विपरीत होऊन जाईल यांत संशय नाहीं; तथापि प्रसंगविशेषीं ह्यासंबंधाची त्रोटक माहिती ह्या मागांत आम्हांस दिल्यावांचून गत्यंतर नसल्यानें तो आमच्या वाचकांच्या नजरेखालून जाणार आहे.
रणजितसिंगास औरस व अनौरस असे पुत्र होते. त्यां- पैकी राजपुत्र खडकसिंग हा एक औरस पुत्र असून त्याचे स्याजवर खरें प्रेम होते. एकंदर त्यास अउरा बायका होत्या; त्यांपैकी फक लग्नाच्या नऊ असून बाकीच्या रखेल्या होत्या. ह्या अठरा स्त्रियांत कांहीं शीख रजबूत स्त्रिया व कांहीं मुसलमानशीख स्त्रिया होत्या, त्यांत त्याचें ज्यांवर विशेष प्रेम होते व ज्यांपासून वंशवृक्ष वाढला अशांचेंच वर्णन आम्ही येथे देतों.
आमच्या वाचकांच्या लक्षांत असलेच कीं, रणजित्सिंगाचें पहिले लग्न त्याच्या सहाव्या वर्षी म्हणजे इ. स. १७८६ व कन्हैय्या मिसलीचा बलाढ्य सरदार जयसिंग ह्याच्या नाती बरोबर झाले. तिची आई सदाकुवर ही मोठी कारस्थानी