पान:महाराज रणजितसिंह यांचे चरित्र.pdf/६२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ५७ )

बायको असल्याचें आम्ही मार्गे एके ठिकाणीं लिहिलेल वाचकांस आठवत असेलच. तिनें राजपुत्र खडकसिंगावर रणजितसिंगाची अत्यंत प्रीति आहे असे जाणून व हाच पूर्णपणे लाहोर येथील गादीचा मालक होईल असें समजून विचार केला की, आपल्या मुलीस पुत्र संतान होऊन तो पुढे राज्यास अधिकारी व्हावा म्हणून इ. स. १८०५ त तिनें नूतन जन्मास आलेला असा एक पोरका मुलगा मिळवून व तो आपल्याच कन्येच्या उदरी जन्मास आला असे प्रसिद्ध करून त्याचें नांव ईसर सिंग असें ठेविलें, परंतु तो मुलगा सुमारें दीड वर्षाचा होऊन मृत्यु पावला; तेव्हां पुढच्या वर्षी म्हणजे इ. स. १८०७ त रणजितसिंग सिस् सतलज प्रांतावर स्वारी करण्याकरितां गेला ही संधी साधून त्या उपद्व्यापी बाईनें महताब कुवर गरोदर असल्याचे प्रसिद्ध करून तो परत आल्यावर त्यापुढे दोन अति लहान अर्भके आणून ठेविली. वास्तविक पहातां ह्या दोन मुलांपैकी एक मुलगा लाहोर येथील एका फेरीवाल्याचा होता; व दुसरा तिनें आपल्याच एका दासीपासून जन्मतःच विकत घेऊन ते जुळेच जन्मास आले असे जाहीर केलें. रणजितसिंगानें प्रथम दर्शनी त्या दोन्ही मुलांकडे मुळींच लक्ष दिलें नाहीं; कारण तो आपल्या सासूस पुरा ओळखून होता. त्यानें मसा विचार केला कीं, ह्या खटपटी स्त्रीच्या कृत्रिमाचा आमच विचार केल्यास कदाचित् मलतेच एकादें लचांड ती उपस्थित करील. याकरितां तो दुसऱ्या वर्षी पुन्हां कंपनी सरकारबरो- बर सिस्- सतलज प्रांतासंबंधाने तडजोड करण्याकरितां निवाला तेव्हां आपल्या सासूच्या आग्रहास्तव ते आवळे जावळे मुलगे आपलेच आहेत असें म्हणून त्याने त्यांस