पान:महाराज रणजितसिंह यांचे चरित्र.pdf/६३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(५८ )

'राजपुत्र' अशी संज्ञा दिली. ह्या दोन मुलांपैकी एकाचें नांक तारासिंग व दुसन्याचें नांव शेरसिंग असें ठेविलें होतें. तारासिंग हा मूर्ख होता; शेरसिंग हा तारासिंगाप्रमाणे नूर्ख तर खरात्र, पण सुंदर असून कांहींसा शूर होता. शेरसिंगास खडकसिंगाचा पुत्र नवनिहालसिंगाच्या मागून पंजाबची गादी कांहीं दिवस मिळाली होती. त्यास इ. स. १८४३ त सिंधनवाला शीख सरदारांनी मारेकऱ्यांकरवीं ठार मारिलें.
 रणजितसिंगाचें दुसरें .लग्न नक्काई मिसलीचा मुख्य रामसिंग ह्याच्या राजकुवर नामक कन्येबरोबर इ. स. १७९८ त झालें. तिच्या उदरीं इ. स. १८०२ त राजपुत्र खडक-: सिंग ' जन्मास आला. ह्या खडकसिंगावर रणजितसिंगाची अत्यंत प्रीति असे हें आम्ही मार्गे सांगितलेच आहे. हा आपल्या बापाप्रमाणेंच शूर होता; तथापि तो कांहींसा हल- कट स्वभावाचा असल्यामुळे त्याचें तेज त्या दरबारांत व हाताखालच्या लोकांवर फारसें पडत नसे तो आपल्या बापास वेळोवेळी लढाईच्या किंवा स्वारीच्या काम चांगली मदत करीत असे. त्यास बरेच प्रतिस्पर्धी होते, त्यांत जम्मू संस्थान- बाले मुख्य होत. रणजितसिंगाच्या पश्चात् खडकसिंगास पंजाबची गादी प्राप्त झाली, तिचा त्यानें थोडे दिवस उपभोग घेतल्यानंतर त्याचे प्रतिस्पर्धी जे वर सांगितलेले जम्मू सरदार त्यांनी त्यास विषप्रयोग करवून निजधामास पाठवून दिलें. इतकेंच करून ते दुष्ट संतुष्ट राहिले असें नाहीं. तर त्याचा एकुलता एक पुत्र - नवनिहालसिंग - यासही त्यांनीं तो आपल्या बापाचे म्हणजे खडकसिंगासचे उसर कार्य करून परत येत असतां । वाटेंत गुप्तपर्णे मारेकरी घालवून ठार केलें !! असो.