पान:महाराज रणजितसिंह यांचे चरित्र.pdf/६४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ५९ )

रणजितसिंगाच्या वरील दोनच स्त्रिया फक्त राजकुलोतन्न होत्या. त्यांशिवाय आणखी बऱ्याच सुंदर स्त्रिया, बायका म्हणून त्याने आपल्या जनानखान्यांत आणून ठेविल्या होत्या. त्यांपैकी मोरन नामक स्त्रीवर त्याचे विशेष प्रेम होतें. ही स्त्री रणजितसिंगाचा एक मुसलमान जातीचा हलक्या दर्जाचा नोकर होता त्याची मुलगी होती. तिला इ. स. १८०६ त त्यानें आपल्या जनानखान्यांत आणिलें. 1. मोरनवर तो इतका फिदा झाला होता कीं, दिवसांतून एक वेळतरी तिचें मुखावलोकन केल्याविना त्यास कांहीं सुचत नसे. त्यामुळे त्याच्यावर इतर स्त्रियांपेक्षां तिचेच वर्चस्व . जास्त बसलें होतें. तिनें त्याजपासून आपल्यास फिरोजपूर बक्षीस करून घेतलें होते. फार काय सांगावें ? तिच्या आधीन तो इतका झाला होता की ईस्ट इंडिया कंपनीच्या टांकसाळेंत त्याने तिच्या नांवाचें स्वतंत्र नाणें सुद्धां पाडिलें होतें !
इ. स. १८३३ त रणजितसिंगार्ने अमृतसर येथील एक मुसलमान सरदारकन्या गुल्बेगम् इजबरोबर लग्न लाविलें. हा ग्नविधि त्या रजपूत शीख राजानें महमदीशास्त्राप्रमाणे केला होता. आम्ही मार्गे सांगितलें आहे कीं, शीखधर्म हा हिंदू व मुसलमानी ह्या दोन धर्मातील तत्त्वांशांपासून नानके यार्णे स्थापित केला; म्हणून गुल्बेगम् बरोबर रणजितसिंगाचें जें हैं लग्न झालें तें त्या धर्मास अनुसरूनच असल्यामुळे त्यांत कांहीं विशेष मानण्याजोगें नाहीं. असो. त्याखेरीज झिंदन नांवाची एका घोडेवाल्याची मुलगी रणजितसिंगाच्या जनान- वान्यांत होती. तिच्या बापाचें नांव मानसिंग असें होतें. ती अतिशय खुबसुरत असल्यामुळे यः कश्चित घोडेवाल्याची मुलगी होती तथापि तो तिच्या सौंदर्यास भुलून नेहमी