पान:महाराज रणजितसिंह यांचे चरित्र.pdf/६५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ६० )

तिच्या सहवासांत निमग्न झाला होता. झिंदनच्या भंग खुप मस्करीपणा व गायन आणि नर्तन हे गुण पूर्णपणे मरलेले होते. इ. स. १८३८ त रणजितसिंग अर्धी- गवायूनें पूर्ण वेरिल्यामुळे बेमार झाल्यावर त्यास जनान- खाना अर्थातच वर्ज करावा लागला, तेव्हां झिंदन मन मानेल तसा अविचार करण्यास प्रवृत्त झाली; तेणेंकरून तिची छी: थूः होऊन तिला जनानखन्यांतून हांकून दिले. ज्यावेळीं तिला जनानखान्यांतून घालविलें त्यावेळीं ती गरोदर होती, परंतु ती ह्यापूर्वीच गुलू नांवाच्या भिस्या- . वर लुब्ध असल्याकारणानें तिच्या गरोदरपणाविषयीं दरबारी व जनानखान्यांतील लोकांस संशय उत्पन्न झाला होता. रणजितसिंग दुसऱ्या वर्षी म्हणजे इ. स. १८३९ त जून महिन्याच्या २७ व्या तारखेस त्या भयंकर रोगानें अतिशय पीडित होऊन निवर्तला. मरणकालीं राजपुत्र खडकसिंग यास आपल्या सन्निध बोलावून आणून त्यास आपल्या . गादीचा मालक करून राजा ध्यानसिंग व गुलाबसिंग ह्या दोन संस्थानिकांस आपल्या मुख्य वजिरातीचीं वस्त्रे दिली.
 झिंदन जनानखान्यांतून निघून जम्मू येथे आल्यावर तिनें कोणा लालसिंग नांवाच्या सरदाराचा अंगिकार करून स्वेच्छाचाराने वागूं लागली. तिला थोड्याच दिवसांनीं पुत्र झाला, त्याचे नांव धुलीप' असें ठेविलें. हा धुलीप पुढे धुलिपसिंग ह्या नांवाने प्रसिद्धीस येऊन खडकसिंगाच्या - मागून राज्याचा मालक ठरला. ह्याच्या औरसपणाबद्दल त्या- वेळी बरेच अपवाद उत्पन्न झाले होते. कित्येकांचें असें मत होतें कीं, बुलिपसिंगाची आई झिंदन नसून दुसरी कोणी चांगल्या कुलांतील स्त्री असावी. पण ह्या गोष्टीस कोठें चांगलासा