पान:महाराज रणजितसिंह यांचे चरित्र.pdf/६६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

( ६१ )

आधार सांपडत नाहीं. तथापि हें खरें आहे कीं, सर- दार लालसिंग व झिंदन हीं दोघें धुलिपसिंगास बरोबर घेऊन जम्मू येथून लाहोरास आली; व त्यांनी दरबारांत ढवळाढवळ करण्यास सुरवात केली. तेव्हां रणजितसिंगाचें परमस्नेही कंपनी सरकार, त्यानें लाहोरास आपले लष्कर ताबडतोब पाठ- विलं. हैं वर्त्तमान जम्मूराजे ध्यानसिंग व गुलाबसिंग ह्यांस कळ- तांच त्यांनी इ. स. १८४८ त लाहोर येथे येऊन कदाचित् कंपनी सरकाराने लाहोर दरवाराबरोबर इ. स. १८०९ त जो स्नेहवर्धक तह केला आहे तो तें सरकार आतां विसरून जाऊन सर्व पंजाब खालसा करील म्हणून, व राजा लाल- सिंग व झिंदन यांनी लाहोरास पुंडाई व झोटिंग पातशाही चाल- विली होती ती बंद व्हावी म्हणून, त्या उभयतांनीं धुलिपसिं- गास त्याच्या आई जवळून घेऊन लाहोरच्या गादीवर बसविलें. ह्यावेळीं धुलिपसिंग ९ वर्षीचा होता. नंतर झिंदन व तिचा अंगिकार करणारा लालसिंग ह्यांस त्यांनीं तेथून हांकून दिलें. असो. ह्याप्रमाणें रणजितसिंगाच्या मृत्यूनंतर पंजाबचें राज्य पुढे थोड्याच दिवसांनी खालसा होण्याच्या बेतांत आले असतां वरील दोघां जम्मू सरदारांनीं तें कांहीं दिवस- पावेतों म्हणजे इ. स. १८४८ पर्यंत कसें तरी राखिलें याबद्दल ते सरदार स्तुतीस पात्र आहेत यांत संदेह नाहीं. तसेंच कंपनीसरकारही ह्यावेळीं आपल्या वचनास जागृत राहिले याबद्दल त्याचे जितके आभार मानावे तितके थोडेच आहेत.
येणेंप्रमाणे पंजाबचा राजा रणजितसिंग ह्याच्या कारकी- दींचा अल्पसा इतिहास, आम्हांस प्रस्तुत जी माहिती मिळाली तिजवरून, आम्ही आमच्या वाचकांस सादर