पान:महाराज रणजितसिंह यांचे चरित्र.pdf/६७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ६२ )

केला आहे. आणखी हेंही येथे नमूद करितों कीं, रणजित सिंगासारखा लोभी मनुष्य त्यावेळीं जरी दुसरा कोणी नव्हता, व त्यामुळेच त्यानें आपलें शीर लहानपणा- पासून हातांत घेऊन जीवापाड कष्ट सोसून पंजाबचें राज्य संपादिलें व अपार संपत्तीही मिळविली, तरी तो फार उदार अंतःकरणाचा मनुष्य होता असे म्हटल्यावांचून आमच्यानें राहवत नाहीं. त्यानें आपल्या अमदानीत वरीच चैनवाजी करून आपल्या संपत्तीचा नाश केला होता तरी त्यानें धर्मकृ- त्याकडे

  • नानखाना आणि दिरावाचा नानक, येथील त्याचे उपाध्ये व कुलगुरु वगैरे लोकांकरितां सुमारे पंचवीस पासून तीस लक्षांवर रुपयांचा खर्च केला होता. त्याचा प्रेत संस्कार कांहीं हिंदू व कांहीं मुसलमानी धर्माप्रमाणें करण्यांत आला.
समाप्त.

* हें शीख लोकांच्या पहिल्या गुरुचे जन्मस्थान. है रणजित्-

सिंगाचें कबरस्थान.