पान:महाराज रणजितसिंह यांचे चरित्र.pdf/७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २ ) लेलीं धर्मतत्वें शिकविलीं त्यावरून या नवीन धर्मास 'शीखधर्म' ( शिष्यधर्म ) असें नांव प्राप्त झाले, आणि तदनुयायी लोकांस 'शीख ' ( शिष्य) असे म्हणण्याचा पाठ पडला; तो अद्यापि कायम आहे. शीख लोकांचें जे धर्मपुस्तक आहे त्यास 'आदिग्रंथ' अशी संज्ञा आहे. हिंदू लोकांत जसे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे चार वर्णभेद आहेत तसे शीखलोकांतही फुलकियन, अहलुवालिया, भांगी, कन्हैया, रामगढिया, सिंगपुरिया, क्रोरासिंगिया, निशाणिया, सुकरचकिया, दुलेलवालिया, नक्काईद आणि शाहीद असे बारा वर्णभेद म्हणजे मिसली आहेत. या सर्व मिसळींतील लोक एकाच ठिकाणी राहत होते असें नाहीं. त्यांचा परस्प- रांमध्ये वर्णभेदामुळे एकोपा मुळींच नव्हता. वरील बारा मिसलीपैकी अहलुवालिया, भांगी, कन्हैया, रामगढिया, सुकरचकिया व नक्काईलोक सतलज नदीच्या उत्तरप्रांतीं राहत असत व अद्यापिही त्याच प्रदेशांत त्या लोकांची वस्ती वरीच आहे. बाकी राहिलेल्या सहा मिसलींतील लोक त्याच नदीच्या दक्षिणप्रांतीं राहतात. असो. याप्रमाणे शीखधर्माविषयीं व लोकांविषयी थोड- क्यांत विवेचन करून आमचा सुप्रसिद्ध योद्धा व चरित्र- नायक महाराज रणजितसिंग याच्या पूर्वजांचें अल्पचरित्र आम्ही प्रथमारंभी वाचकांस सादर करितों. वरील सुकरचकिया मिसलींत 'महासिंग' नांवाचा सानसी नामक जाटकुळांत एक मोठा शूर व लौकिकवान् पुरुष सुमारें अठराव्या शतकाच्या उत्तरार्धोत होऊन गेला. त्याचा बाप 'चरतूसिंग' यार्णे लाहोर येथील अफगाण सुभेदार 'उबेदखान' याजबरोबर कित्येकवेळां मोठ्या निकराच्या लढाया