पान:महाराज रणजितसिंह यांचे चरित्र.pdf/९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ४ )

गास बोलाविलें, आणि उभयतांचा स्नेहसंबंध कायम राहावा म्हणून त्यांच्यांतील पूर्वापार वहिवाटीप्रमाणे त्यांनी परस्प-- रांच्या पागोट्यांची अदलाबदल केली. महानसिंगास ते पाहिजेच होतें; कारण अशा रीतीनें तरी आपला हेतु तडीस जावा असे त्याच्या मनांत फार होतें. या उभयतांचा बर- प्रमाणे स्नेह जडल्यानंतर ब्रिजलालदेवानें कन्हैया मिसलीचा मुख्य राजा हकीकत्सिंग यासही आपल्या कुमकेस बोला विलें; तेव्हां या त्रिवर्गानी मिळून त्या भांगी सरदारांची खोड मोडून ब्रिजलालदेवास त्याचा गेलेला मुलूख परत मिळवून देण्याचा निश्चय केला; परंतु जेव्हां ऐनवेळीं ब्रिजलाल- देवाचा पक्ष सोडून देऊन जम्मू शहरावरच कन्हैया हकीकत्- सिंगानें चाल केली तेव्हां त्याचें कपट दृष्टीस पडून ब्रिजलाल- देवाचे डोळे उघडले व त्यास दरसाल पन्नास हजार रुपये देण्याचें कबूल करून प्रसंग टाळावा लागला. हकीकत्सिंगाचें हें कृत्य महानसिंगास आवडलें नाहीं, म्हणून त्यानें ब्रिजलाल देवाचा पक्ष कायम धरून हकीकसिंगास हात दाखविण्याचा विचार केला. परंतु हकीकसिंग पुढे थोडक्याच दिवसांनीं मरण पावला, त्यामुळे त्याचा क्रोधाग्नि तसाच धुमसून राहिला.
 महानसिंगार्ने ब्रिजलालदेवाशीं शपथ वाहून त्याचें मित्रत्व संपादिलें होतें असें वर सांगितले आहे; तथापि पुढें कांहीं दिवसांनी त्या उभयतांत चुरस उत्पन्न झाली; तेणेकरून महानसिंगानें आपला हेतू सिद्धिस नेण्यास ही संधी बरी आहे असें जाणून जम्मू शहरावर एके दिवशीं अकस्मात् हल्ला करून तें लुटलें आणि तेथील राजवाड्यास आग लावून तो जाळून टाकिला. नंतर महा- नूसिंग गुजरानवाला येथें परत आल्यावर त्यास त्याचवर्षी