पान:महाराणी चिमणाबाई सयाजीराव गायकवाड.pdf/२०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

'ग्रंथमय' महाराणी

 महाराणी चिमणाबाईंमधील एक जिज्ञासू वाचक निर्माण होण्यामागे सयाजीरावांची प्रेरणा होती. महाराजांसोबत केलेल्या जगप्रवासातून त्यांची दृष्टी अधिक विशाल झाली होती. महाराजा सयाजीराव यांचा वाचनाचा व्यासंग खूप मोठा होता. पुढे तोच गुण महाराणींनी घेतला. त्या निरनिराळ्या प्रदेशातील साहित्य वाचू लागल्या. , वैचारिक आणि गंभीर वाचन करण्याकडे त्यांचा जास्त कल होता. त्यांनी वाचलेली काही पुस्तके यादृष्टीने विचारात घेता येतील. 'रेमिनीसनस ऑफ लेडी डोरोथी नेव्हिल', 'सर्व्हिस बुक फॉर द वाइफ', 'रुलर्स ऑफ इंडिया', 'इंडिया अंडर हर्ष', 'द ड्युटिज ऑफ मॅन', 'द लॉस ऑफ मून' अशा अनेक महत्त्वाच्या ग्रंथांचे वाचन महाराणींनी केले होते. वाचन करत असताना त्या स्त्रीविषयक माहिती मिळवण्यासाठी प्रयत्नशील असत. वाचनाचा त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर इतका परिणाम झाला होता की त्या बोलताना पुस्तकातील संदर्भ देऊन बोलत असत. महाराजांप्रमाणेच त्यांचेही ग्रंथालय समृद्ध होते.

 अनेक विषयावरील आणि भाषांमधील पुस्तके त्यांच्या ग्रंथालयात होती. 'द ड्युटिज ऑफ मॅन' या पुस्तकाचा खूप प्रभाव चिमणाबाईंवर होता. मॅझिनी या इटालियन देशभक्ताचे हे पुस्तक होते. या पुस्तकाचा चिमणाबाईंवरचा प्रभाव पाहून महाराजांनी हे पुस्तक वाचण्यास घेतले. पुढे असे झाले की, या पुस्तकाची दुसरी प्रत मिळेपर्यंत दोघांनी हे पुस्तक दिवसाचा अर्धा-अर्धा वेळ विभागून वाचले. ही आठवण मिस टोटेनहॅम यांनी त्यांच्या

महाराणी चिमणाबाई सयाजीराव गायकवाड / २०