पान:महाराणी चिमणाबाई सयाजीराव गायकवाड.pdf/२६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 महाराणी चिमणाबाई यांच्या उत्तुंग बौद्धिक व्यक्तिमत्त्वाची साक्ष असणारा हा ग्रंथ सर्व भारतीय भाषांमध्ये अनुवादित झाला तर भारतीय स्त्रीला आपली जीवनविषयक भूमिका निश्चित करण्यासाठी तो प्रेरणादायी ठरेल. याबरोबरच जागतिक कर्तृत्व सिद्ध करूनही इतिहासात अदृश्य असणाऱ्या या राणीच्या कर्तृत्वाला भारतीय इतिहासाने न्याय दिला असे होईल. फक्त महाराष्ट्रालाच नव्हे तर भारताला भूषण असणाऱ्या या महान राणीचा मृत्यू २३ ऑगस्ट १९६३ मध्ये झाला.

...
महाराणी चिमणाबाई सयाजीराव गायकवाड / २६