पान:महाराष्ट्रकाव्य मकरंद.pdf/55

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५२] महाराष्ट्रकाव्यमकरंद. [ रामदास. (५६) नायके त्यास शिकवी । वडीलांसि जाणीव दावी । तो० (५७) आपणाहून जो श्रेष्ट । तयासि अत्यंत निकट । शिकवणीचा मानी वीट । तो० (५८) वोळखीविण संग धरी । तो० (५९) आपणासि जेथें मान । तेथें अखंड करी गमन । रझू नेणे मानाभिमान । तो० . (६०) सेवक जाहला लक्ष्मीवंत । तयाचा होय अंकित । तो. (६१ ) दंडी अपराधाविण । स्वल्पासाठी जो कृपण । तो० (६२) घरींच्यावरी खाय दाढा । बाहेर दीन बापुडा ! तो० (६३) नीच यातीसिं संगत । परांगनेसिं एकांत ॥ मार्गे जाय खात खात । तो० (६४) स्वयें नेणे परोपकार । उपकाराचा अनुपकार । करी थोडे बोले फार । तो० (६५) विद्या वैभव ना धन । पुरुषार्थ सामर्थ्य ना मान । कोरडाच वाहे अभिमान । तो० (६६) उंची जाऊनि वस्त्र नेसे । चौबारां बाहेरि बसे । तो० (६७) जयासि नाही दृढ बुद्धि । तो० (६८) जिवलगासी परम खेदी । सुखाचा शब्द तोही नेदी। नीच जनांसी वंदी । तो० (६९) शरणागतासी अव्हेरी । लक्ष्मीचा भरंवसा धरी । तो०