पान:महाराष्ट्रकाव्य मकरंद.pdf/70

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[६७ मोरोपंत. महाराष्ट्रकाव्यमकरंद. (८९) संसर्गे भोगावें पुण्य जसें साधु हो तसे पाप. (९०) छळकासि कवि न शापिति; देते जड कनक काय हो गाळी? पाळी जो त्याशि मधुर इक्षु तसा त्याहि अदय जो गाळी. (९१) लाभ नसे ताप वसे ज्यामध्ये तो कुसंग सोडावा. वनपर्व. (१) अचल करींच असावा व्यवहारी शब्द संगरी सदसी. (२) क्रोध असावा समयीं केवळ वश चित्त न क्षमेला हो. (३) काय न दगड तपस्वी भिजला वृष्टीत तापला ऊनी. (४) .. .. .. ... कार्यपरें सर्वथा न लाजावें. (५) कामा क्रोधा लोभा अनुसरतां लोक फार बा ठकले. न करावा सद्वेष, स्वहिता देऊं नयेचि पाठ कले. (६) कोणाहि कुळांत नसो निज बाळकघातहेतु म्हातारा. (७) कृष्णा हांसोनि म्हणे भामे मोहावयाशि पतिला जे मंत्राद्युपाय करणे या श्रवणे बहु मदीय मति लाजे. में पतिचरणांशि न देउनि दे हात तायिताला जे, ते स्त्री न रुचे पतिला, की तीतें आततायिता लाजे. जाणे वशीकरण हे-करित्ये जेणे कधीं न कोपति तें; सखि तूंहि असेंचि करीं; मद मत्सर दाखवू नको पतितें. १ चांगले खड्ग. २ घातकीपणा.