पान:महाराष्ट्राचे पंचप्राण.pdf/५

या पानाचे मुद्रितशोधन करतांना काही समस्या उद्भवल्या आहेत
(३)


देशोन्नतीसाठी सदोदित झटत राहतात. अशा या आजकालच्या पांच थोर विभूति कोण हें कांहीं सांगितलेच पाहिजे असें नाहीं. न्या. माधवराव गोविंद रानडे, निबंधमालाकार विष्णु कृष्ण चिपळूणकर, प्रिन्सिपॉल गोपाळ गणेश आगरकर, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, व भारतसेवक ना. गोपाळ कृष्ण गोखले याच त्या विभूति. गेल्या पन्नास वर्षांतील सर्व सामाजिक, राजकीय व शैक्षणिक चळवळींचें उगमस्थान हा आमचा महाराष्ट्र देश झाला, हा आमचा महाराष्ट्र सर्व हिंदुस्तानचा नेता झाला याचें कारण असले थोर पांच देशभक्त या आमच्या महाराष्ट्राचे पोटीं जन्मास आले हेच होय. आतां जरी हे थोर पुरुष आम य चर्मचक्षूंना दिसत नाहींत तरी ते आम्हांस सोडून गेले नाहींत. आमच्यावर त्यांचे इतकें उत्कट प्रेम आहे कीं, आम्हांला सोडून ते कधीच जाणार नाहीत. ते अजरामर झाले आहेत. तेव्हां या महाराष्ट्रकुलदीपकांचीं चरित्रे आमच्या प्रिय बाळकांना सांगितलीच पाहिजेत. तीं चरित्रें आमच्या प्रिय बाळकांना सन्मार्गाकडे नेतील, ती आमच्या बालकांची शरीरें व मर्ने सुदृढ व सुसंस्कृत कर तील व मग आमचे प्रिय बालक व बालिका या थोर विभूतींचें अनुकरण करून त्यांचेप्रमाणेच धन्य धन्य म्हणवून घेतील व देशाला चांगले दिवस दाखवतील अशी आमची खात्री आहे. म्हणूनच 'महाराष्ट्राचे पंचप्राण' हे त्यांच्या चरित्राचें सुंदर पुस्तक आज आमच्या प्रिय बाळांस आम्हीं नजर करीत आहों. अशाच बोध व रंजन करणाऱ्या सुबोध सच्चरित्रांची मराठी बालवाङ्मयांत भर घालावी अशी आमची इच्छा आहे ती तो दयाघन परमेश्वर पूर्ण करो अशी त्याची अनन्य भावें प्रार्थना करून हा प्रस्तावनालेख पुरा करतों. ता. २५ आगट ) सन १९२१. > लेखक विष्णु विनायक करमरकर.