पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/116

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८६२ त तिची साधारण पडापड झालेली होती, व आंत ४ जुन्या निरुपयोगी तोफा पडलेल्या होत्या. इ० स० १७१३ त कान्होजी आंग्रे शाहूच्या पक्षास मिळाल्यामुळे त्याने त्याला कोकणांत जे सोळा सवघड किल्ले बक्षिस दिले त्यांत या किल्ल्याचे नांव आहे. या गोष्टीवरून पूर्वी याला बरेच महत्त्व असावे असे वाटते. २५ साठवलीचा किल्ला.--साठवली हा गांव मुचकुंदी नदी किंवा पूर्णगडची खाडी हिच्या कांठी तिच्या मुखापासून सुमारे १२मैसांवर आहे. या गावी नदींच्या कांठी एक लहानसा किल्ला बांधलेला आहे. त्याचे क्षेत्रफळ सुमारे ६ एकर आहे. त्याच्या तटाला एकंदर सहा बुरूज आहेत. साठवली. या गांवीं मुसलमान लोकांची बरीच वस्ती आहे व तेथे बरीच जुनी घराणी आहेत. ते लोक असे सांगतात की, पूर्वी साठवली येथे फार मोठा व्यापार चालत असे व त्याच्या संरक्षणाकरतांच तेथील किल्ला बांधलेला होता. शाहूमहाराजांनी कान्होजी आंग्र्यास इ० स० १७ १३त जे सोळा सवघड किल्ले दिले, त्यांत या किल्लयाचे नांव मोडतें. इ० स० १८१८ त त्याचे स्वामित्व इंग्लिशांकडे आले. हल्ली या किल्ल्याची सर्वत्र पडापड झालेली आहे, व आंत एक जुनी निरूपयोगी तोफ पडलेली आहे. . देवगड तालुका विजयदुर्ग किंवा घेरिया-हा किल्ला देवगड तालुक्यांत मुंबईच्या दक्षिणेस १७० मैलांवर आहे. हा -:*: