पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/135

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१२७) संबंधाने कोल्हापुरचा राजा व वाडीचे सावंत यांच्यामध्ये बराच झगडा चालला होता. शेवटी त्याचे स्वामित्व सावं. तांकडेच कायम राहिले. इ. स. १८१८ त इंग्लिशांचा त्या प्रांतांत कायमचा अमल बसल्यावर निवती व रेडी हे दोन किल्ले त्या वेळी सावंतांच्या ताब्यात असल्यामुळे त्यांचे लोक आसपासच्या इंग्लिशांच्या अमलांतील खेड्यांना बराच त्रास देऊ लागले. त्या वेळी कीर साहेब बरोबर सैन्य घेऊन कोकणांत आला. तो तारखि २ फेब्रुवारी इ. स. १८१९ रोजी निवती किल्लयाजवळ येऊन पोहोंचला. तिसऱ्या तारखेस त्याने किल्लयावर आपला तोफखाना सुरू केला, व चवथ्या तारखेस तो किल्ला इंग्लिशांचे हस्तगत झाला. ३९ रामगडः हा किल्ला मालवण तालुक्यांत बेलें बुद्रुक नांवाच्या खेड्यांत मोडतो. हा किल्ला एका टेकडीवर बांधलेला असून त्याचे क्षेत्रफळ सुमारे आठ एकर आहे. त्याच्या तटाची उंची ८ फूट असून त्याची रुंदी सुमारे १० फूट आहे व त्याचा परीघ सुमारे ७०० यार्ड आहे. तटाला एकंदर १५ बुरूज असून त्यांपैकी बहुतेकांना तोफा मारण्याकरितां तीन तीन भोके ठेविलेली आहेत. किल्ल्याचा दरवाजा पश्चिमेच्या अंगास असून त्याची रुंदी ८ फूट व लांबी १५ फूट आहे. दरवाज्यांतून वर जाण्यास उत्तम फरसबंदी पायऱ्या बांधलेल्या आहेत. आंत किल्लेदाराचा राहण्याचा वाडा असून शिवाय एक देवालय आहे. या देवालयाचे बांधकाम फार सुरेख असून तें औरसचौरस ३६ यार्ड आहे. इ. स. १८६२ त या किल्लयाची पहाणी झाली तेव्हां त्याच्या तटाच्या भिंती अगदीं पडावयास