पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/179

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१७१) फूट आहे. किल्लयाचा तट २० फूट उंच व १० फूट रुंद आहे. हा किल्ला शिरहट्टीचे खानगवंडे देसाई यांनी सुमारे २५० वर्षापूर्वी बांधला असे म्हणतात. उत्तरेच्या बाजूचा तट ४ फुटांपर्यंत दगड व चुना यांनी बांधलेला आहे. चार फुटांवरचा तट मातीचा आहे; व बाकीचा तीन बाजूंचा तट दगड व माती ह्यानी बांधलेला आहे, उत्तरेकडील तट केवळ मातीचा असल्यामुळे इ० स० १८५८ त हा किल्ला पाडण्याचे विशेष कारण आहे, असे इंग्लिशसरकारास वाटले नाही. याचे संबंधाने ऐतिहासिक माहिती उपलब्ध नाही. येलवट्टी येथे सुमारे दीड हजार लोकांची वस्ती आहे. येथील गणेश्वराचे देवालय प्रसिद्ध असून तेथे लांबलांबची यात्रा जमते. या देवालयाच्या दरवाज्यावर एक शिलालेख आहे. त्यांत असे लिहिले आहे. की, " आषाढ शुद्ध १२ प्रमाथी संवत्सर शके १०७३ ( इ. स. ११५१ ) या दिवशी संक्रांत होती. त्या दिवशी राजा चालुक्य विक्रमचक्रवर्ती त्रिभुवनमाल वीर रंगीदेव याने गणपतीला सहा मार ( ? ) जमीन इनाम दिली अशाबद्दल पुज्यान्याच्या हातावर पाणी सोडले. "