पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/79

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(७१) ३९ सिदगडः—हा किल्ला मुरबाडच्या अग्नेयीस ९० मैलांवर आहे. या किल्ल्याचे आंतला व बाहेरला असे दोन भाग आहेत. बाहेरचा किंवा खालचा किल्ला गायधरा घांटाच्या वर ९०० फूट उंच आहे, व समुद्राच्या सपाटीपासून २४०० फूट उंच आहे, त्याचा तट विशेष उंच नसून त्याची दागदुजीही नीट रीतीने केलेली नव्हती. वरच्या किंवा आंतल्या किल्ल्यावर जाण्यास या खालच्या किल्ल्यास फक्त एकच दरवाजा आहे. वरचा किल्ला समुद्राच्या सपाटीपासून ३२३६ फूट आहे, व खालच्या किल्ल्यापेक्षा ९०० फूट उंच आहे. वर जाण्याचा रस्ता फार अवघड आहे. ह्याची लांबी २४६ फूट व रुंदी ७५ फूट आहे. हा किल्ला एका सुमारे सवा मैल लांबीच्या टेकडीच्या एका अरुंद शिखरावर बांधलेला आहे. याच्या प्रत्येक बाजूस तुटलेला कडा आहे. इ. स. १८१८ त ह्या किल्ल्याची बहुतेक पडापड झालेली होती.फक्त एक लहानशी भिंत शिल्लक राहिलेली होती, व तिचीही पडापड सुरू झालेली होती; जागोजाग कांटेरी झाडेझुडपें उगवलेली होती, व आंत पूर्वी एखादी इमारत होती किंवा नव्हती याचा पत्ताही लागत नव्हता. जरी या वरच्या किल्ल्याची पडापड झालेली होती, तरी त्याची चढण फारच बिकट असल्यामुळे, व तो सुळक्यासारखा उंच असल्यामुळं त्यावर जाण्याचे काम फारच मुष्किलाच होते. किल्ल्याचे माथ्यावर पडापड झालेल्या भिंताडांच्या शेजारी खडकांत खोदलेली पुष्कळ टांकी आहेत, व त्यांचे पाणीही फार उत्तम आहे. खालच्या किल्ल्यालाही पाण्याचा पुरवठा फार चांगला आहे. इ० स० १८१८ त या किल्लयांत एक