पान:महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण दशा आणि दिशा (Maharashtratil Mahila va Balkalyan Dasha va Disha).pdf/12

हे पान प्रमाणित केलेले आहे.

तुम्ही तुमच्या मुलांचे ‘गुन्हेगार' ठरता!


 २९ सप्टेंबर १९९०, न्यूयॉर्क! संयुक्त राष्ट्रसंघाच्या कार्यालयापुढील विस्तीर्ण आवार रात्रीच्या अंधारातही उजळून निघालं होतं. जगातील अनेक देशांमधील हजारो मुलं आपल्या चिमुकल्या हातात लखलखणाच्या मेणबत्त्या घेऊन आनंदोत्सव साजरा करीत होती. वर आकाशात लाख-लाख तारे लुकलुकणाच्या, सारं जग लखलखीत करणा-या या चिमुकल्या मुलांचा आनंदोत्सव पाहात होते. त्यांना लाजवणारा प्रकाश पृथ्वीतलावर अवतरल्याचा भास व्हावा असे प्रकाशकुंज सर्वत्र पसरलेले होते. मुलांनी अकाली साजच्या केलेल्या दिवाळीचं, नाताळचं विशेष प्रयोजन होतं.. ती खरोखरीच शतकोत्तर स्मरणीय घटना होती. संयुक्त राष्ट्रसंघाच्या कार्यालयात बहात्तर देशांचे राष्ट्रप्रमुख बालकविषयक जागतिक शिखर परिषदेच्या निमित्ताने एकत्र जमले होते. त्या दिवशी त्यांनी बालक हक्कांच्या जाहीरनाम्यानुसार तयार करण्यात आलेल्या वैश्विक करारावर स्वाक्ष-या करून जगातील सर्व मुलांना जणू स्वत्व बहाल केलं... आनंदोत्सव होता तो या स्वातंत्र्यने स्वराज्यप्राप्तीचा. आता या करारामुळे जगात बालकल्याण बालक हक्क या संदर्भात केवळ सद्भावना व सहानुभूतीचे वातावरण राहणार नाही, तर त्यामुळे सर्व जगात एक सार्वत्रिक वैधानिक व्यवस्था कायम केली जाईल. जिच्यामुळे जगातील सर्व मुलांना जन्मतः काही हक्क प्राप्त होईल. त्या हक्कांच्या रक्षणासाठी सर्व देशातील शासन यंत्रणा, स्वयंसेवी संघटना कार्यरत होतील.
 जीनिव्हा घोषणापत्र

 ‘बालक हक्क' कल्पनेचा उदय झाला तो पहिल्या महायुद्धानंतर. या युद्धात मोठी मनुष्यहानी झाली व युद्धात आई-वडील कामी आल्यामुळे लाखो मुले अनाथ-निराधार झाली. युद्धोत्तर काळात १९२४ साली जगातील परस्पर वैरभाव दूर करून शांतीप्रस्थापना व विश्वबंधुत्वाच्या भावनेने ‘जीनिव्हा घोषणापत्र

महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण : दशा आणि दिशा...९