पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/९८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाषांतरांतील फरकांचा अभ्यास करण्याची आव- श्यकता आहे. दुसरी इमारत बांधणारा किंवा भाषांतर कर- णारा हे दोघेहि मूळ कृतीचे टीकाकार आहेत पण ते बेजबाबदार टीकाकार नाहींत तर ते आपणास कृति करावी लागणार आहे तर आप- णांस मूळ कसें सुधारतां येईल म्हणून विधायक विचार करणारे टीकाकार आहेत हे लक्षांत ठेवले पाहिजे. मोरोपंतांनी जे फरक केले आहेत त्यांवरून त्यांचे काव्यविवेचकत्व चांगलेच दिसून येतें. वर दिलेल्या उदाहरणांत जीं तत्र दिसून येतात तीं येणेप्रमाणे. - (१) जेव्हां मनुष्य आपला बेत बदलतो आणि निराशेच्या क्षोभास दूर सारतो तेव्हां त्यास कर्तृ- स्वास प्रेरणा कशी झाली हे समजावून दिले पाहिजे. (२) कृष्णास जेव्हां रुक्मिणीचा निरोप कळ- वावयाचा होता तेव्हां वाचक तो निरोप ऐक ण्यासाठीं उासुक असतो आणि यासाठी निरोप घेऊन येणाऱ्या मनुष्याच्या स्वास्थ्याच्या चौकशीचें व्याख्यान उपयोगी नाहीं. (३) नववधू नवऱ्याबरोबर जात असतां व त्यांत नवन्यावर संकट आले आणि ते आपल्या- मुळे आले अशी भीति तिच्या मनांत वाटत असतां तिला धीर आणि नवन्यावर विश्वास हीं उत्पन्न होण्यासाठीं कांहीं तरी नवयाने सांगि- तलें पाहिजे. पण तें बढाईचें सांगून उपयोगीं नाहीं, यासाठी कृष्णानें यादवदळाच्या शौर्याचे वर्णन सविस्तर करणें अवश्य आहे. (४) ब्राह्मण रुक्मिणीस येऊन भेटतो तेव्हा त्याच्या आगमनानें तिला उल्लास उत्पन्न होतो त्या प्रसंगीं उपमायुक्त वर्णन करण्यास कवीनें चुकू नये. (५) नूतन जन्म पावलेल्या बाळकाचे हरण होतें तेव्हा तोहि प्रसंग उपमाई आहे. ८५ भाषांतरकार आणि त्यांचे मूळपरीक्षण (६) आईला आपलें नष्ट झालेलें बालक दिसतें पण त्यास ती एकदम ओळखीत नाहीं पण तिला संदेह उत्पन्न होतो तेव्हां तो प्रसंग विशेष कौशल्याने आणि विस्ताराने वर्णन कर- ण्याजोगा आहे. (७) जेव्हां नारदासारख्याच्या वचनानें आई अगदीं अपरिचित तरुणाचा आपला मुलगा म्हणून स्वीकार करते तेव्हां नारदाचे महत्त्व विशेष सविस्तर वर्णिलें पाहिजे. येणेप्रमाणे मूळग्रंथाचें मोरोपंतांकडून परक्षिण होऊन त्यांनी आपला कृष्णविजय लिहिला है स्पष्टच आहे. मराठीतील भाषांतरे पुष्कळच आहेत आणि त्या भाषांतरांत कवीचें मूळग्रंथावर परीक्षण दिसून येर्ते. भाषांतरांतील भेदस्थळे गोळा केली म्हणजे भाषांतरकारांची मूळपंथविषयक मतें कळतात. त्यांत प्रसंग अनेक आणि अत्यंत विविध आहेत भारत, भागवत, रामायण हे ग्रंथ मोठाले आहेत, आणि त्यांपैकी अनेक प्रसंगी भाषांतरकारांनां मूळप्रथांतील वर्णन अपूर्व किंवा कमी सरस वाटून त्यांनी आपापल्या मतीनें फरक केले आहेत. यांचा कारांचे मूळप्रथपरीक्षण अधिक स्पष्ट होईल. जसजसा जास्त अभ्यास होईल तसतसें भाषांतर- परीक्षण आज अत्यंत व्यापकपणे करण्यास अव- काश नाहीं, तथापि मोरोपंतांच्या ग्रंथांतील फार थोड्या पानांच्या तौलनिक अवलोकनावरून एवढें तरी खात्रीने पटतें कीं मोरोपंतांची काव्याभिरुचेि उच्च तऱ्हेची होती. हाताशी घेतलेला ग्रंथ काव्य- निर्दोष नाहीं तर त्यांत सुधारणेस अव- काश पुष्कळ आहे याची मोरोपंतांस चांगलीच जाणीव होती, आणि काव्यपरीक्षणाच्या इति- हासांत भाषांतरकर्त्यांनी दाखविलेले काव्यपरी- क्षण ही मोठी महत्त्वाची बाब आहे.