पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/8

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्तावना.' प्रसिद्धि व प्रसार करण्याविषयी अप्पयंदीक्षितांस प्रेमपूर्वक विनंति केली होती.' जगन्नाथपंडित आणि अप्पयदीक्षित यांची काशी येथें गांठ पडल्याचा मागें उल्लेख केला आहे. शेषोपाव्ह श्रीरुष्णपंडित हे भट्टोजिदीक्षितांचे गुरुं. त्या पंडितांचे चिरंजीव वीरेश्वरपंडित. हे जगन्नाथाचे गुरु होते. तेव्हां जगन्नाथ हा दीक्षितांच्या बरोबरचा किंवा थोडा धाकटा असावा असें दिसते. यावरून जगन्नाथ आपल्या पंचविशीच्या सुमाराला अकबराच्या कारकीर्दीत असण्याचा संभव आहे. जगन्नाथाचें क्य भट्टोजिदीक्षितांच्या बरोबरीचे होते, आणि तो इ. स. १६५८ सालापर्यंत वांचला अशी कल्पना केली तर त्याचे वय मरणसमयीं ऐशी वर्षांचे होते असे होईल; आणि इतके दिवस वांचणे मुळीच असंभवनीय नाही. जगन्नाथाची ऐशी वर्षांचा आयुर्मयादा गृहीत धरली तर त्याची यौवनावस्था अकबराच्या कारकीर्दीत येते; मध्य वय जहांगिराच्या अमदानीत जाते; आणि वार्धक्य शहाजहानाच्या काळाशी सुसंगत होते. अकबराच्या लवंगी नांवाच्या तरुण कन्येच्या समागमांत पंडितांचें तारुण्य जाणे, व परिणतवयांत विद्येचा परिपाक झाल्यावर त्यास शहाजहानाकडून पंडितराय ही पदवी मिळणे यांत काही विसंगतपणा नाही एवढेच नव्हे, तर एक प्रकारे अनुरूपताही आहे. तेव्हां अकबर, जहांगीर आणि शहाजहान या तिघांच्याही कारकीर्दीत जगन्नाथ होता असे मानण्यास काही हरकत नाही. भट्टोजिदीक्षित, अप्पयदीक्षित आणि जगन्नाथ हे तिघेही महापाण्डित असून एकाच वेळेला होते असे दिसते.दक्षिणेत रामदास, तुकाराम, वामनपाण्डित हे स्थूलमानाने जगन्नाथाचे सम १ कविचरित्र. २ रसगंगाधर; पृष्ठ ६ वें. ३ तिसरे परिशिष्ट पहा.