पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/१०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
अेक अुद्योग]

[३


माझें काम टिळकांना कितपत पसंत पडणार ? त्यांचा माझा स्वभाव कसा जुळणार ? सर्वच अनिश्चित. असें असतांहि मुनसफी व वकिली हीं दोनहि सोडून देऊन वर्तमानपत्री लेखकाची जी पहिली जागा मला मिळाली ती मी अुडी घालून घेतली. या सर्वांवरून साहित्य व वाङ्मय ही माझी निष्ठा ठरते--म्हणजे व्यवसायात्मक बुद्धीने निर्णय करून ठरविलेला आत्मविश्वासाचा मार्ग ठरतो असें मी म्हणूं शकतों.
 ( ३ ) मी पांसष्ट वर्षाचा होअून कार्यनिवृत्त झालों त्या वेळीं मला जी स्थिति लाभली होती तिचीं अनेक कारणें सांगतां येतात. उदाहरणार्थ, केसरीचें संपादकत्व, टिळकांचा आधार व आश्रय, सार्वजनिक कार्यांत दिसून आलेली माझी थोडीशी बुद्धिमत्ता व पुष्कळशी अुद्योग-प्रियता इत्यादि. तथापि त्यापलीकडच्या मूळ कारणांचा विचार करतां दोन कारणें निश्चितपणें सांगतां येतात. (१) माझी अेल्अेल्. बी. ची पदवी आणि (२) माझी संपादक साहित्यिक होण्याची पात्रता. यांपैकीं कोणतीहि अेक गोष्ट मला प्रथम अनुकूल नसती तर पुण्यास टिळकांकडे येण्याची संधि मला लाभली नसती. टिळकांची त्या वेळची मुख्य नड लॉ-क्लास शिकविण्यासारखा सहकारी व मराठा पत्र चालविण्यासारखा उपसंपादक अेकाच व्यक्तींत मिळणें अशी सजोड होती. आणि या दोनहि नडी अेकाच वेळीं भागविण्यासारखा मी होतों. मी नुसता अेल्अेल्. बी. असतों पण मराठा पत्र चालविण्यासारखा नसतों, तर मला टिळक घेतेना. कारण लॉ-क्लास चालवूं शकणारे नुसते अेल्अेल्. बी. पुण्यास त्यांना पुष्कळ मिळते. माझ्या आधीचे वाकनीस वकील अेल्अेल्. बी. होतेच ना ! पण ते 'टिळकां' चें मराठा पत्र चालविण्याच्या उपयोगी नव्हते. बरें, मी नुसता मराठा पत्र चालविणारा, किंबहुना समजा चांगलें अिंग्रजी लिहिणारा असतों, तरी तेवढ्यावर टिळक आपणाकडे मला घेतेना. कारण मराठ्याच्या उत्पन्नांतून भर पगारी वेगळा संपादक त्यांना तेव्हा ठेवतां येण्यासारखा नव्हता. मराठ्याच्या अर्धपगाराला लॉ-क्लासच्या पूर्ण पगाराची भर घालावी तेव्हां अेक माणसाला भरपूर देण्यासारखा पगार व्हावयाचा. आता टिळकांनी पुढे खाडिलकरांना ते नुसते बी. अे. होते तरी घेतलें, याचें कारण मी असल्याने त्यांची लॉ-क्लासच्या शिक्षकाची गरज भागली होती. पण खाडिलकर