पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/११

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
४]

[माझा जन्मभरचा


अेल्अेल्. बी. नव्हते व अिंग्रजी लिहिण्याच्या अुमेदीचेहि नव्हते. यामुळे माझ्याअैवजी तेच प्रथम शिफारस होअून दृष्टीसमोर येते, तरी त्यांना घेऊन टिळकांची मराठा पत्राची गरज भागतीना म्हणून त्यांना टिळकांना घेतां आलें नसतें.

 ( ४ ) तात्पर्य, माझी दोनहि प्रकारची पात्रता अेकाच वेळीं सिद्ध होती म्हणूनच मला घेणें टिळकांना सोयीचें झालें. पण पुढे तीन वर्षांनी लॉ-क्लास बंद झाला अर्थात् लॉ-क्लासकरिता कायद्याच्या ज्ञानाची गरज संपली होती. लॉ-क्लासचा पगारहि संपला होता. तेव्हा मी पुण्यास वकिली करून मराठ्याकरिता साठ रुपये घेअून राहण्यास तयार झालों असतों, तर अिंग्रजी वर्तमानपत्री अुपसंपादक म्हणून टिळक मला ठेवून घेते. वर्तमानपत्राच्या संपादकालाहि कायद्याचें ज्ञान असलेलें चांगलें, असें टिळकांना वाटे. म्हणूनच पुढे त्यांनी रा. ग. वि. केतकर ( टिळकांचे नातू ) यांना बी. अे. झाल्याबरोबर केसरीकडे न घेतां अेल्अेल्. बी. कडे घातलें. तथापि वर्तमानपत्राच्या संपादकाला कायद्याचें ज्ञान नसलेंच तरी चालण्यासारखें आहे; मात्र त्याला वर्तमानपत्र चांगलें चालवितां येण्याला लागणारी साहित्यिक या नात्याची पात्रता तरी असावी, हा अनिर्वाहपक्ष टिळक मान्य करीत. आणि मी व खाडिलकर हे १८९७ पासून मराठा व केसरी यांचे अुपसंपादक म्हणून कायम झालों ते शेवटीं आम्हां दोघांच्या साहित्यविषयक पात्रतेमुळे. खाडिलकर शेवटीं अेल्अेल्. बी. झालेच नाहीत, आणि मी असून नसुन सारखाच झालों. तथापि केसरीला हवें तसें खाडिलकर मराठी लिहीत व मराठ्याला हवें तसें मी अिंग्रजी लिहीं. यामुळे आम्हां दोघांविषयी टिळकांना या बाबतींत अितकें समाधान होतें की, आमच्या जागीं अधिक चांगला लेखक म्हणून कोणी आणावा, असें टिळकांच्या मनांत पुढे कधीहि आलें नाही. माझ्यापुरतें सांगण्याचें तात्पर्य अितकेंच की, प्रारंभी जरी माझ्या अेल्अेल्. बी. पदवीने मला निःसंशय हात दिला, तरी पुढे सर्व आयुष्यभर मला माझी वर्तमानपत्री साहित्यिक पात्रताच अुपयोगींं पडली; व मीहि तोच अेक अुद्योग करून राहिलों. म्हणून तत्त्वतः साहित्य हीच माझी निष्ठा ठरते.