पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/११३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
१०६]

[माझा जन्मभरचा


विवेचनपद्धति दोनहि दृष्टींनी तें फार चांगलें वठलें आहे असें कांही संस्कृतज्ञ मित्रांनी ( अुदाहरणार्थ वामनशास्त्री किंजवडेकरादि ) मला खऱ्या भावाने सांगितलें. या भाषणांत, संस्कृत वाङ्मय हें, व्याकरण व संधिनिर्बंध यांच्यामुळे, निष्कारण कठिण व गूढ कां वाटतें, आणि तें सोपें सुलभ कसें करतां येअील, याची चर्चा मीं केली आहे. या कारणाने, मराठींतील नष्कारण अनुस्वारांविरुद्ध झालेल्या चळवळीचा जसा मीं आधुनिक जनक ठरतों, तसाच संस्कृतांतील निष्कारण संधीविरुद्ध चळवळीचाहि ठरलों आहें. आणि या दोनहि चळवळींना थोडेबहुत यश आलें आहे व पुढे आणखीहि येअील.
 (९६) १९३५ साली मीं 'सह्याद्रि' मासिक सुरू केलें. त्याच्या माथ्यावर सह्याद्रिविषयक अेखादा अवतरणरूप संस्कृत श्लोक घालण्याची आवश्यकता भासली. तेव्हा तो श्लोक मीच खालीलप्रमाणे तयार केला --
 श्रीरामदासशिवगणचरणांजितधूलिधूसरितमौलिः ।
 निश्चलवृतिररिसागरभङगश्रीर्जयति जगति सह्याद्रिः ॥

 हा श्लोक पूर्णपणें श्लेषात्मक आहे हें वाचकांच्या लक्षांत येअीलच.

 (९७) यानंतर बेळगांव व पुणें येथील संस्कृत साहित्य-संमेलनांत संस्कृत लेख लिहून वाचले. मला संस्कृत बोलतां येत नाही, प्रयत्नाने लिहितां येतें. तथापि संस्कृत भाषेंतील या माझ्या अुपद्वयापावरून अेखाद्या अपरिचित मनुष्याची कल्पना माझ्या संस्कृत-ज्ञानाविषयी होअील ती मात्र खरी ठरणार नाही. माझें हें ज्ञान अगदीच तुटपुंजें आहे. आणि थोड्या भांडवलावर मोठ्या व्यापाराचा देखावा अुत्पन्न करणारा असें माझें मीच जें वर्णन थट्टेनें केव्हा केव्हा करतों तें या संस्कृत ज्ञानासंबंधाने खरेंच आहे.
 (९८) यापूर्वी असाच आणखी अेक प्रसंग अगदी अनपेक्षित रीतीने आला. तो असा-सौ. क्षमाबाओ राव ( डॉ. राव यांच्या पत्नी व कै. शंकर पांडुरंग पंडित यांच्या कन्या) या सुविद्य असून, त्यांना अिंग्रजी, फ्रेंच अित्यादि भाषा येतात. पण संस्कृत भाषेवरील त्यांचें प्रभुत्व व तिची