पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/१३५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
१२८]

[माझा जन्मभरचा


   गौर्गोः कामदुधा सम्यक् प्रयुक्ता स्मर्यते बुधैः
   दुष्प्रयुक्ता पुनर्गो त्वं प्रयोक्तुः सैव शंसति
 ( वाणी-वाङ्मय-याचा योग्य अुचित अुपयोग केला तर ती गाईसारखी दूध देऊन मनोरथ पूर्ण करते. पण तोच जर तिचा अनुचित अुपयोग होअील तर तो करणारा बैलच म्हणावा लागतो. )
 अशीं किती तरी आणखी संस्कृत वचनें देतां येतील. साहित्य व वाङ्मय यांच्या गुण वर्णनासंबंधी मराठी भाषेंतीलहि दोनच अुतारे घेअूं. अेक ज्ञानेश्वरांचा व दुसरा श्रीरामदासांचा. दोघांहि संतकवींनी ग्रंथारंभीं वाङ्मयप्रशस्ति केली आहे ती अशी-

रामदासांची कविस्तुति

   शब्दरत्नाचे सागर   -ज्ञानियांचा परमार्थुं
   शब्दसृष्टीचे अीश्वर   -मुमुक्षूंचें अंजन
   सरस्वतीचें निजस्थान   -साधकांचें साधन
   नाना कळांचें जीवन   -सिद्धांचें समाधान
   बोलके चिंतामणी   -स्वधर्माचा आश्रय
   कामधेनूची दुभणी   -मनाचा मनोजय
   कल्पनेचे कल्पतरू   -ध्यानस्थांची ध्यानमूर्ति
   प्रेमळांची प्रेमळ स्थिति  -सामर्थ्यवंताची सत्ता
   वाग्विलास करणारी शक्ति  -सकळसिद्धींचा निर्धार
   सृष्टीचा अलंकार   -देवाचे रूपकर्ते
   विचक्षणाची कुशलता   -विवेकनिधीचें भांडार
   लक्ष्मीचा शृंगार   -निरंजनाची संपत्ति
   अमृताचे ओघ   - विराटाची योगस्थिति
   नवरसाचे मेघ   -भक्तीची फलश्रुति
   नाना सुखांचें सरोवर  -अीश्वराचा पवाड
   सुखाचीं तारवें  - आदिशक्तीचें ठेवणें
नसता कवींचा व्यापार । तरी कैचा असता जगदोद्धार | म्हणोनी कवी हे आधार । सकळ सृष्टीसी ॥