पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/१४

हे पान प्रमाणित केलेले आहे.
अेक अुद्योग]

[७


आणि ती तशी खरोखर थांबतीच तर मला कोणी आळशी, सुस्तावलेला, म्हणून नांवें ठेवलीं नसतीं खचित. परंतु या नंतरच्या दहा वर्षांतच मी काय किती लिहिलें याची यादीच देतोंं :-

१९३२  राज्यशास्त्र ( शास्त्रग्रंथ ).
१९३३  भारतीय तत्त्वज्ञान ( संग्रहग्रंथ ).
१९३४  नवलपूरचा संस्थानिक (कादंबरी).

फ्रान्सची राज्यक्रांति (अितिहास).
१९३५
तिरंगी नवमतवाद ( राजकारण ).
बलिदान (कादंबरी).
१९३६
पद्यगुच्छ- कांही भाग (काव्य).

१९३७  हास्य-विनोदमीमांसा ( चिकित्सा ग्रंथ ).
१९३८  समग्र केळकर वाङमय ( संग्रह ) .
  [तयारी जुळवाजुळव छपाअी].
१९३९  गतगोष्टी (आत्मचरित्र).

कावळा व ढापी (कादंबरी)
१९४०
फ्रान्सची झाशीवाली (चरित्र).

१९४१  'गतगोष्टी'ची पुरवणी ( पत्र-व्यवहार ).
१९४२  कोकणचा पोर (कादंबरी).

 याशिवाय अनेक अध्यक्षीय भाषणें, लघुकथा, लघुनिबंध, विनोदी चुटके, अभिप्राय, प्रस्तावना, 'सह्याद्रि' मासिकांतील प्रासंगिक लेख अित्यादि किती तरी ! म्हणजे यांत नाटकाशिवाय वाङमयाचा कोणताहि प्रकार राहिला नाही. १९३८ साली श्री. तात्यासाहेब पटवर्धन, संस्थानाधिपति मिरज, यांच्या औदार्यामुळे व स्नेहामुळे, प्रत्येकी हजार पृष्ठें अशा बारा खंडांत, माझें त्यावेळेपर्यंत 'समग्र' म्हणतां येण्यासारखें, बारा हजार पृष्ठांचें वाङ्मय प्रसिद्ध झालें. परंतु त्यानंतरहि मी लिहिलेलें वाङ्मय सुमारें दीड-दोन हजार पृष्ठें तरी भरेल. लिहिण्याचा कंटाळा वाटणाराच्या मतें या माझ्या करमणुकीला खरोखर करमणूक हें नांव कितपत द्यावें हा प्रश्नच होअील. पण मला तीच करमणूक ठरली.