पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/१५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
८]

[माझा जन्मभरचा


 (९) अजूनहि माझा हात थांबलेला नाही. पण यापुढे मी वाङमय लिहिणें म्हणजे ती अेखाद्या व्यसनाची तलफ भागविणें असें कोणी म्हटल्यास मला त्याला नांवें ठेवतां येणार नाहीत. तथापि माझीं संकल्पित अशीं कांहीं पुस्तकें लिहून पुरीं व्हावयाचीं आहेत. त्यांत चार कादंबऱ्या असून त्या अर्धवट लिहून झाल्या आहेत. त्यांचीं नांवें ( १ ) अंधारवड ( २ ) जगाची रीत (३) प्रमिला - नवमहिला व (४) दिवाण झिप्री. याशिवाय (५) जागतिक तत्त्वज्ञानावर निबंधरूप किंवा प्रश्नोत्तर संवादरूप असा सुलभ ग्रंथ लिहिण्याचें माझ्या मनांत आहे. पण या वाङ्मयव्यसनाची तलफ कशी काय भागते, पार पडते, हें आता पाहावयाचें आहे.
 (१०) अुतारवयांत मधून मधून आळस झाडण्याकरितां मनुष्याला अेखादें व्यसन अपयोगी पडतें. त्याप्रमाणें कोणी तपकीर, कोणी विडी- सिगारेट, कोणी पान-तंबाखू यांची मदत घेतात. पण पहिली चीज घाणेरडी व दुसरी अपायकारक म्हणून त्या मला नको वाटतात. चार मित्रमंडळींत बसलों असतां, ह्रीं व्यसनें असणाऱ्या अितर कोणाकडून मी तपकिरीची चिमूट घेतों, सिगारेट मागून घेऊन ओढतों. पण त्या वस्तु स्वतःच्या संग्रहीं ठेवून त्याचा नित्य अुपयोग करणें हें माझ्या मनाला मानवत नाही. म्हटलें तर हीं दोनहि व्यसनें प्रतिष्ठितच आहेत. आणि सत्तरी अुलटलेल्या मनुष्याने, वेळ जाण्याकरितां, तसलें अेखादे व्यसन मुद्दामहि स्वीकारलें, तरी त्याला कोणाला भिण्यालाजण्याचें कारण नसतें. बरें, ह्यांच्या खर्चाचीहि अडचण मला नाही. पण त्या व्यसनी पदार्थांच्या अतिरेकाची मनांतून भीति ! मात्र अेक हौस निरुपद्रवी म्हणून ती करावीशी वाटते. ती पानविड्याचें तबक ठेवून मधून मधून विडा करून कुटून खाणें ही होय. कारण अेकदा विडा करून कुटून खावयाचा म्हणजे त्या उद्योगांत सहजासहजी कांही वेळ जाअून विरंगुळा लाभतो. पण हें निरुपद्रवी व्यसनहि मला माझ्या एका विशेष स्वभावदोषामुळे अजून पार पाडवलें नाही. तो दोष म्हणजे स्वत: हाताने अेखादें काम करण्याचा कंटाळा. मग हें काम टेबल पुसण्याचें असो, स्वतःच्या कपड्यांच्या घड्या घालण्याचें असो, प्रवासाचें सामान जुळवून बांधण्याचें असो, बूट पायांत चढवून त्याच्या दोन्या बांधण्याचें असो, टाअीपरायटरवर लिहिण्याचें असो, वीणा लावण्याचें असो, किंवा हार्मोनिअम