पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/१६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
अेक अुद्योग]

[९


वाजवावयाचें असो. फक्त अेकच गोष्ट मला स्वतःच्या हाताने करतां येते, व ती करण्याचा मनाने कंटाळा येत नाही. ती म्हणजे लेखणी घेअुन लिहिणें. आणि हात थकेपर्यंत तें काम मात्र मी अनेक वेळा केलें आहे. यामुळे अितर रीतीने कंटाळा आला म्हणजे मी कांही तरी पुस्तक घेऊन पान निघेल तेथें वाचूं तरी लागतों, किंवा विचार आला की लगेच लेखणी घेअून तो कागदावर अुतरतों.
 (११) याने व्यसनाची तलफ भागल्यासारखें होतें. कारण तलफ भागणें म्हणजे तरी काय ? मस्तकांत साकळून राहिलेल्या रक्ताच्या दाबाला कशाने तरी झटका देणें ! हें रक्त साकळलें म्हणजे डोक्यांत खाजल्यासारखें होतें. आणि हाताने खाजविल्याने जसें शरिराला बरें वाटतें, तसेंच तपकिरीची चिमूट ओढल्याने, विडीचा झुरका मारल्याने, किंवा विड्याचा रस गळ्याखाली गेल्याने ज्ञानतंतु अुत्तेजित होतात. म्हणून लिहिण्याशिवाय पानसुपारीचा संच जुळविण्याचा उद्योग अजूनहि मी करीन, तो कारभार मोठा अुमदा वाटतो. स्वच्छ पितळीं डब्यांत विड्यांची गहिरी पानें भरून ठेवायचीं! त्यांवर ओलें फडकें टाकून ठेवावयाचें! त्यांत सुगंधी केवडा वगैरे घालावयाचा ! तलफ आली म्हणजे प्रशस्त मांडी घालून डबा अुघडायचा ! मग अेकेक पान घेऊन तीं पिकलीं न पिकलीं पाहावयाचें ! त्यांचें डेख व टोक कुरतडून शिरा काढावयाच्या ! ( आणि पानाला धक्का न लावतां शिरा सोलणें ही एक मोठी विद्याहि आहे बरें का ! ) मग पाण्यांत बुडी मारून बसलेल्या चुन्याला बाहेर काढून घेअून, तो न्यायबुद्धीने पानाच्या सर्वांगाला सारखा फासावयाचा! मग त्यावर त्रयोदशापैकी अनुकूल असेल तो अेकेक पदार्थ यथाप्रमाण घालावयाचा ! मग तोंडांत दांत असल्यास पट्टी करून तोंडांत घालून चावावयाची, किंवा दांत पडलेले असल्यास खलबत्त्यांत कुटून चांदीच्या चमच्याने पानावर काढून घेअून त्याची गोळी करून तोंडांत घालावयाची ! आणि मग मधून मधून मुखरस गळयाखाली सोडीत असतां, तोंडावरून (विशेषतः मिशा असल्यास) अैटीने हात फिरवावयाचा ! या वेळीं कोणी बोलावयाला आल्यास त्याच्याबरोबर अर्धे ओठ मिटून, राजदरबारीं नोकर धन्यापुढे बोलतात त्याप्रमाणें - - अदबीने पण वस्तुतः तोडांतील लाल मुखरस कपड्यावर सांडेल या भीतीने-