पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/१७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
१०]

[माझा जन्मभरचा


बोलावयाचें ! आणि असा अेक बार भरला म्हणजे मग कांही पानें काढून घेअून, कुजट भाग कातरून, तीं फडक्यावर पुसून पुन: डब्यांत भरून त्याला झांकण लावावयाचें! या गोष्टीला पांच मिनिटें लागतात व केवढी निरुपद्रवी करमणूक होते ! ( वरील वर्णनांत हातावर तंबाखु-जरदा चोळून, त्याची चिमूट हळूच तोंडांत टाकून, हात झाडावयाचा समावेश मी केला नाहीच ! )

 (१२) असो. व्यसनाचें हें कौतुक बस्स झालें. माझ्या लिहिण्याच्या व्यसनासंबंधी हें सांगावयाचें की, तेंहि या पानविड्याच्या व्यसनासारखेंच विरंगुळा लाभविणारें व निरुपद्रवी आहेच. पण त्याचा दुसराहि अेक अुपयोग मला अलीकडे होअूं लागला आहे तो असा. कोणाहि माणसाच्या डोक्यांत कोणते ना कोणते तरी विचार अेकसारखे घोळत असतातच. पण वार्धक्यामुळे हल्ली माझें असें होअूं लागलें आहे की, त्यांतला अेखादा विचार डोक्याची पकड घेतो. वरचेवर तोच आठवावा, घर करून राहावा, दुसन्या विचाराला त्याने जागा देअूं नये - तात्पर्य, भोवरा फिरत राहिल्याने तो जसें जमिनींत भोक पाडतो तसें या विचारामुळे होतें. पण मौज ही की, तो डोक्यांतून काढून टाकण्याचा अेक अुपाय हटकून यशस्वी होतो. असा की, तो विचार कागदावर अुतरावा म्हणजे झालें ! मी असें अैकलें आहे की, कोर्टांत मुकदमा भांडून निकालांत निघेपर्यंत, म्हणजे वकिलाला बोलावयाचें तें बोलून होअीपर्यंत, वकिलाच्या डोक्यांत मुकदम्याच्या किती तरी गोष्टी --रकमा, तारखा, निशाण्यांचे नंबर, दस्तअैवजांतील महत्त्वाचीं वाक्यें - भरून राहिलेल्या असतात. जितक्या की, कागद पाहिल्याशिवाय त्या तो तोंडाने सांगू शकतो; पण काम संपवून घरीं येअून ते कागद त्याने टाकून दिले की, तो त्या सर्व विसरून जातो. त्याप्रमाणें हल्ली असा डोक्याचा ताबा घेअून राहणारा विचार मी कागदावर लिहून टाकला, म्हणजे एखाद्या हट्टी समंधाने गती घ्यावी त्याप्रमाणें तो नाहीसा होतो.

 ( १३ ) अशा रीतीने व्यसनाची तलफ भागविण्यासारख्या लिहिलेल्या वाङ्मयाचे गुण केव्हा केव्हा कमी प्रतीचे भरण्याचा संभव सहजच असतो. यामुळे अेखाद वेळ असें वाटतें की न लिहिलेलें बरें. पण