पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/१८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
अेक अुद्योग]

[११


सुदैवाने आता या वयांत लिहिलेल्या वाङ्मयाला कोणी बरें म्हटलें, वाअीट म्हंटलें, तरी मला त्याची किंमत सारखीच वाटते. साहित्यशास्त्री मम्मट याने काव्याचीं (म्हणजे साहित्याचीं) जीं प्रयोजनें सांगितलीं आहेत त्यांतील अेकहि आता माझ्या वाङमयलेखनाला लागू पडणारें नाहीं. यश, द्रव्यप्राप्ति अित्यादि जे लाभ मला वाङ्मयलेखनापासून व्हावयाचे, म्हणजे होणें योग्य किंवा अपेक्षित, तितके सगळे मला मिळून चुकले आहेत. वडिलकीच्या नात्याने साहित्याचार्य असें मला कोणी म्हणतात तें कदाचित् ठीक असेल. पण त्यानंतर 'साहित्यसम्राट् ' ही जी पल्लेदार पदवी कांहीच्या कडून मला लावण्यांत येते, ती मनाला बरी वाटत नाही, कारण तिच्या योगाने त्यांच्या गौरवबुद्धीपेक्षा माझा गर्वच अधिक दिसायचा ! बरें, माझ्या लेखनकलेच्या दोषांचा अुल्लेख टीकाकारांकडून व्हावयाचा तो पूर्वीच झाला आहे, व त्या दोषांत मी अलीकडे नवी भर घातलेली नाही. आता माझें पाहणें अितकेंच असतें की, हल्ली जें मी लिहितों तें केवळ म्हातारपणाच्या दोषांमुळे अगदी भलतेंच कांही तरी लिहीत नाहीना ! पण अजून तशी भीति फारशी वाटत नाही. कारण अद्यापि मला लिहिण्याला नवे विषय किती तरी सुचतात. माझ्या बुद्धीला, सारग्राहकतेला, सारासार विवेकाला, कोणतीहि मोठी विकृति जडलेली नाही, आणि मी जें कांही लिहितों तें विशेष नांवाजण्यासारखें नसलें, तरी विशेष नांवें ठेवण्यासारखेंहि नसतें असा विश्वास माझा मला वाटतो. कारण मी जें लिहितों तें साधार असतें, व अुपयुक्तहि असतें. माझ्या बरोबरीच्या साहित्यिकांना त्यांत कांही विशेष नाही असें वाटलें तरी, असा अेक मोठा वाचकवर्ग आहे की जो माझे लेख अुत्सुकतेने व आदरवुद्धीने वाचतो. आणि अशा वाचकांची मी करमणूक तरी करतों, किंवा त्यांना कांही नवीन सांगतों, असें मला समाधान वाटतें. न लिहिण्याला काय घ्याल असें मला कोणी म्हणण्याची वेळ खास आलेली नाही. शिवाय विषयवैचित्र्य हा जो माझ्या वाङ्मयांत असलेला अेक गुण तो अजून कायम आहे. वाङमयाचा हा किंवा तो अेकेक विशिष्ट प्रकारच घेतला, तर त्यांत केव्हा केव्हा माझ्यापेक्षा अधिक चांगली निर्मिति करणारे लेखक आहेत. आणि त्यांचें तें यश मी निर्मत्सरपणें केव्हाहि कबूल करतों. पण अुलट त्यांनाहि हें कबूल करावें