पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/१९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
१२]

[माझा जन्मभरचा


लागेल की, माझें लेखन अनेकांगी आहे, यामुळे त्याचा अुपयोग जसा सर्व प्रकारच्या वाचकांना होअूं शकतो, तसा त्यांच्या अेकांगी लेखनाने होत नाही.
 (१४) मी वाङ्मयलेखनांत कालक्रमाच्या जोरावर अेखादें विशेषस्थान मिळविलें असलें, तरी मी हें प्रांजळपणें कबूल करतों की वाङ्मयांत असें स्थान आज न मिळणारापेक्षा मी अधिक बुद्धिवान आहें असें मुळीच नाही. माझी बुद्धि कांही कांही कार्यांमध्ये कमीच पडली याचें प्रमाण हें की विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांत म्हणजे परीक्षांमध्ये मला कोणताहि विशेष मिळवितां आला नाही, बक्षीस लाभलें नाही, स्कॉलरशिप नाही, फेलोशिप नाही. यामुळे मी अुदरनिर्वाहाचा धंदा शोधूं लागलों तेव्हा कोणत्याहि विषयांत कॉलेज प्रोफेसर होअूं शकलों नाही. ती गोष्ट माझ्या आशेच्या पलीकडची वाटे. नेहमी तिसऱ्या वर्गांत पास होणाऱ्या मला प्रारंभीं तरी शाळामास्तरीपेक्षां शिक्षणक्षेत्रांत अधिक कांही लाभलें नसतें. अेल्अेल्.बी.च्या परीक्षेने चालचलाअू वकिलीला लागणाऱ्यापेक्षा अधिक ज्ञान मला कायद्यांतहि लाभलें नव्हतें. अुलट माझ्याबरोबरीच्या विद्यार्थ्यांत कित्येक असे बुद्धिमान असत की ते दुसऱ्या पहिल्या वर्गांत हटकून पास व्हावयाचे, बक्षिसें, स्कॉलरशिपा, शिष्यवृत्त्या मिळवावयाचे. त्यांच्याकडे पाहून मी मनांत खट्टू होअीं. कनिष्ठतेच्या भावनेने चेपून दडपून जाअीं. कॉलेजांतील सर्व काळ मी या ' न्यूनगंडा ' च्या दडपणांत काढला. आणि मला असेंहि वाटतें की, या माझ्या समकालीन विद्यार्थ्यांनी आपली सरस ुद्धि माझ्या प्रमाणें वाङ्मयलेखनाकडे लावली असती तर त्यांच्या माझ्यामधलें मान्यतेचें अंतर मला त्यांनी केव्हाहि तोडूं दिलें नसतें. पण अितर अशा धंद्यांत ते शिरले की त्यांना त्यांत माझ्यापेक्षा द्रव्यप्राप्ति अधिक झाली तरी लोकप्रसिद्धि माझ्यापेक्षा कमी लाभली. अुत्तम वकील किंवा अुत्तम कायदेपंडित न्यायाधीश झाला तरी त्याची प्रसिद्धि त्याच्या तालुक्याजिल्ह्यापुरती. पण संपादकाची जागा ही अशी आहे की तिजमुळे मनुष्याला प्रमाणाबाहेर बिनहिशेबी प्रसिद्धि मिळते. आणि त्यांतच माझ्या वाङ्मयलेखनाच्या सापेक्ष यशाची भर पडल्यामुळे, आणि लोकांना प्रिय वाटणा-या राजकारणी अुद्योगाचा त्याला पाठपुरावा मिळाल्यामुळे, मी माझ्या समकालीन विद्यार्थ्यांपेक्षा अधिक बुद्धिवान असा माझा खोटा लौकिक झाला ! यांत मला चांगलें