पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/२०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
अेक अुद्योग]

[१३


किंवा वाअीट वाटण्यासारखें काय आहे ! पण आपपर तुलना करतांना मला न्यायबुद्धि सोडतां येत नाही.

 (१५) त्यांतल्यात्यांत मौज ही वाटते की ज्या अेका दिशेने मोठेपणा किंवा कीर्ति लाभण्याचा संभव विद्यार्थिदशेंत मला स्वप्नांतहि आला नाही, आणि वर सांगितल्याप्रमाणें, त्या दशेंतलें सगळें आयुष्य मी न्यूनगंडाच्या आपत्तींत घालविलें, त्या दिशेने शेवटीं शेवटीं मला तें यश अनपेक्षित रीतीने लाभलें. तें असें--वाङ्मयलेखक व ग्रंथकार असा माझा लौकिक झाल्याने मला मुंबअी नागपूर विद्यापीठांत अेम्. अे. च्या परीक्षांत परीक्षक म्हणून नेमण्यांत आलें. प्रारंभीं सहजच दुर्लभ वाटणारी प्रोफेसरी शेवटीं लाभून, विद्यापीठाने मला पीअेच्. डी. च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक नेमलें ! म्हणजे विद्यापीठांत मराठी या अभ्यासविषयासंबंधाने मिळण्यासारखा जो जास्तींत जास्त मान तो मला मिळाला. मी युनिव्हर्सिटी फेलोच्या निवडणुकीला अुमेदवार म्हणून उभा राहिलों असतों तर हटकून निवडून आलों असतों. विद्याखात्यांतले अितर श्रेष्ठ मानहि मला कांही मिळाले. अुदाहरणार्थ, डेक्कन अेज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळांत माझी आज आठदहा वर्षें निवडणूक होत आहे. शिक्षण प्रसारक मंडळाचा तर मी कैक वर्षें चेअरमनच आहें. भांडारकर संशोधन संस्थेच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदाचाहि मान मला अनेक त्रैवार्षिक निवडणुकींत मिळाला. आणि ओरिअेंटल कॉन्फरन्सच्या अेका शाखेचा अध्यक्षहि अेक वेळ मी निवडला गेलों.

 (१६) पण याहिपेक्षा जो अेक अवांतर मान मला मिळाला तो सांगण्यांत मला फारच आनंद व अभिमान वाटतो. तो म्हणजे डेक्कन कॉलेज अिन्स्टिट्यूटच्या ट्रस्टीशिपचा. त्याचें कारण असें - कोणाहि विद्यार्थ्याला आपलें कॉलेज म्हटलें की त्याविषयी प्रेम तर वाटतेंच; पण भीतिगर्भ आदरबुद्धिहि मनांत अितकी वाटते की ती सांगतां पुरवत नाही. डेक्कन कॉलेजांत मजप्रमाणें अेक वेळ असणाऱ्या कोणाहि विद्यार्थ्याने त्या वेळची आपली भावना स्मरणाने मनांत आणावी. म्हणजे मग, कॉलेज हें अेक पूजनीय दैवत, व आपण केवळ त्याचे पूजक व्हावें अितकीच आपली